शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांनी अनुभवला शास्त्रीय गायन आणि भक्तीचा संगीताचा अनोखा मिलाफ; आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 18:42 IST

शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांनी अनुभवला. सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाला सुरूवात करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

डोंबिवली- शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांनी अनुभवला. सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाला सुरूवात करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ते श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे.संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प ‘सूरसंगम’ या कार्यक्रमाने गुंफण्यात आले. हा कार्यक्रम आप्पा दातार चौकात आयोजित करण्यात आला होता. आरती अंकलीकर-टिकेकर आणि मंजुषा पाटील यांनी गाणी सादर केली. तसेच आरती यांच्या शिष्या अबोली गद्रे हिने ही त्यांना साथ दिली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंजुषा पाटील यांनी सुहाग राग सादर केला. त्यानंतर त्यांनी कृ ष्णाची आपल्यावर कशी मोहिनी आहे हे सांगणारी एक होरी सादर केली. ‘‘ रंगी सारी गुलाबी चुनिराया रे’’ या होरीला प्रेक्षकांनी टाळ््याच्या कडकडाटात दाद दिली. मंजुषा यांनी दोन गाणी सादर केल्यावर आरती यांनी राग बागेश्री सादर केला. तीन ताल, झप ताल हे आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु डोंबिवलीकर कानसेन असल्याने त्यांच्यासाठी खास पंचाम स्वर त्यांनी ऐकविला. उपशास्त्रीय संगीतातील एक टप्पा म्हणजे झुला. उत्तर भारतात त्या त्या ऋतूत संगीताचे विविध प्रकार गायिले जातात. ऋतुनुसार दादरा, ठुमरी, गजरी, झुला हे प्रकार गायिले जातात असे सांगून आरती यांनी शंकर अंभ्यकर यांनी बांधलेला झुला सादर केला. मंजुषा यांनी ज्ञानेश्वर माऊलीची ‘‘ अवघाचि संसार, सुखाचा करीन’’ ही रचना सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. ही रचना ऐकताना प्रेक्षकांना पंढरपूरची वारी करून आल्याचा प्रयत्य आला. आरती यांनी रामदास स्वामीची रचना असलेला ‘ता ने सूर रंगवावा’ हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. कथ्थक नृत्यात ज्याप्रमाणे गौळण आल्या आहेत त्याप्रमाणे नाटयसंगीतात ही गौळण आल्या आहेत. होनाजी बाळा नाटकातील ‘‘श्री रंगा कमला कांता’’ही गौळण मंजुषाने गायिली. त्यानंतर जोहर माय बाप जोहर हे गीत सादर करण्यात आले. मंजुषा आणि आरती यांनी ‘अवघा रंग एकाचि झाला’ हे गीत गाऊन कार्यक्रमाचे शेवट केला.