शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मेळाव्याकडे लक्ष; अन्य पक्षांत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:37 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे बुधवारी पक्षप्रवेश मेळावा होणार आहे.

उल्हासनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे बुधवारी पक्षप्रवेश मेळावा होणार आहे. काँग्रेस, शिवसेना, साई, रिपाइंसह अन्य पक्षांतील दिग्गज भाजपात प्रवेश करण्याचे संकेत प्रदेश सचिव प्रकाश माखिजा यांनी दिले.उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र, आघाडीतील वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याने सत्तेचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीच्यावेळी साई पक्षातील एक गट फुटून शिवसेनेला मिळाला होता. मात्र, ऐनवेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची खेळी यशस्वी झाल्याने महापौरपदी पंचम कलानी विराजमान झाल्या आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी भाजपातर्फे पक्षप्रवेश मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा धसका इतर पक्षांनी घेतला असून नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गोंजारण्याचे काम त्यात्या राजकीय पक्षांनी सुरू केले आहे.माखिजा यांच्यावर मेळाव्याची जबाबदारी सोपवली आहे. इतर पक्षांतील दिग्गज गळ्याला लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सर्व नीतीचा अवलंब केला जाणार आहे. साई पक्षाच्या पदाधिकाºयांसह शिवसेना, रिपाइं, काँगे्रस पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक पक्षात प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्ता आणेल, असा दावा केला आहे.ओमी टीमला उत्तर देण्याचा प्रयत्नओमी टीमचा बुधवारी कार्यकर्ता मेळावा झाला. यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करून भाजपापुढे आव्हान उभे केले. तसेच विधानसभा निवडणुकीत ओमी टीमचा उमेदवार रिंगणात असेल, असे स्पष्ट केले. या प्रकाराने भाजपात खळबळ उडाली. त्यांनी लगेच हा मेळावा घेत ओमी टीमला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगर