शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

विज्ञान संमेलनातील लक्षवेधी संशोधन : अपघातरोधक रिमो कार ठरली आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 05:36 IST

विज्ञान संमेलन : प्रदर्शनात १४० प्रकल्पांची मांडणी, ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जान्हवी मोर्ये

डोंबिवली : डोंबिवलीत विज्ञान संमेलनानिमित्त भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कल्पकतेची चुणूक दिसली. ग्रामीण भागातून आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचालित एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले ‘अपघात टाळणारी रेमो कार’ आणि ‘नायट्रोजनबेस्ड सन कॅचर’ हे प्रकल्प लक्षवेधक ठरले.

स.वा. जोशी हायस्कूलच्या पटांगणात भरलेल्या या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, ठाणे, उरण, भिवंडी, उस्मानाबाद अशा विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी १४० प्रकल्प मांडले आहेत. तसेच ८०० हून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करून विज्ञानातील गमतीजमतीचा अनुभव उपस्थितांना घडवत आहेत. चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगदर्शन कार्यक्रम हा कार्यक्रमही याठिकाणी सुुरू आहे.उस्मानाबादच्या एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक तत्त्वाचा वापर करून कारमध्ये अपघात टाळणारी यंत्रणा निर्माण केली आहे. रेमो कार असे या प्रकल्पाचे नाव असून पुढील दिशेत असलेला संवेग हा रिव्हर्स असल्यामुळे स्प्रिंगमुळे वजा होतो. त्यामुळे कारच्या अपघाताची तीव्रता कमी होऊ न मृत्यू टाळता येऊ शकतात, अशी संकल्पना यात मांडण्यात आली आहे. शहरी भागात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने ही कार फायदेशीर ठरू शकेल, असे हा प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. याच शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘नायट्रोजनबेस्ड सन कॅचर’ हा प्रकल्प सादर केला आहे. या प्रकल्पात द्रवरूप नायट्रोजनच्या एक्स्पॅन्शन रेश्यो १:६९४ लीटर आहे. अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने प्रकाशकिरण एखाद्या बिंदूवर केंद्रित करून उष्ण कटिबंधीय प्रदेशात या प्रकल्पाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे वायुप्रदूषण रोखता येते आणि जैविक इंधननिर्मितीसाठी वापर करता येतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.सुभेदारवाडा शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आॅनलाइन सेंट्रलायझेस व्होटिंग सिस्टीम हा प्रकल्प मांडला आहे. एक अ‍ॅप तयार करून त्याद्वारे मतदान कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत होऊ शकेल, अशी संकल्पना मांडली आहे. तर, मंजुनाथ विद्यालयाने आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीचे महत्त्व पटवून देताना या पद्धतीचा वापर परदेशात होत असून भारतीयांनी मात्र त्याचे महत्त्व जाणलेले नाही, असे सांगतानाच नैसर्गिक गोष्टींकडे वळण्याचा संदेश दिला.शिवाई बालकमंदिर स्कूलने हायड्रोपोनिक्स शेती प्रकल्प सादर केला आहे. यामध्ये औषधफवारणीमुळे उच्च प्रतीचे अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हायड्रोपोनिक्स शेतीमुळे व्हर्टिकल पद्धतीने ही शेती करता येते आणि फवारणी टाळता येते, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडले आहे. डीएनसी महाविद्यालयाने भविष्यातील इंधन हा प्रकल्प मांडला. यामध्ये त्यांनी प्लास्टिकचे रिसायकलिंग करून त्यापासून पेट्रोल तयार केले आहे.सुभेदारवाडा शाळेने सादर केला विजेविना चालणारा पाण्याचा पंपसुभेदारवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी हायड्रम पंप तयार केला आहे. या पंपाच्या साहाय्याने विजेशिवाय नॉन रिटेनिंग व्हॉल्व्हचा वापर करून पाणी उंचावर नेता येते. पाण्याची दिशा बदलून दुसºया दिशेने पाणी एअर चेंबरमध्ये जाते. व्हॉल्व्हमुळे वर गेलेले पाणी खाली येते. त्याउलट, व्हॉल्व्ह लावलेल्या ठिकाणी एअर चेंबर्समध्ये हवा संकुचित होते आणि पाणी वर ढकलले जाते. या प्रकल्पाचा वापर नदीजोड प्रकल्पासाठी केला जाऊ शकतो. कोयना धरणाचे समुद्राला मिळणारे पाणी अडवून पुन्हा नदीत सोडण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. तसेच दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली जाऊ शकते, असे प्रकल्पप्रमुख साक्षी रानडे आणि ऊर्षिता चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा