शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, गर्दुल्ला हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:23 IST

रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.  

ठाणे : मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकल आल्यावर एका गर्दुल्ल्या दिव्यांगाने पेटता रूमाल दिव्यातील प्रमोद वाडेकर (वय ३४) या अन्य एका दिव्यांग सहप्रवाशाच्या अंगावर फेकल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत वाडेकर यांचे दोन्ही हात होरपळले असून त्यांना मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल केले आहे.

याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  हल्लेखोर गर्दुल्ला पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिव्यातील रहिवासी असलेले वाडेकर हे पवईतील एका हॉटेलमध्ये नोकरीला आहेत. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कांजूरमार्ग येथे छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) ते कल्याण या उपनगरी रेल्वेतून घरी येत होते, तर फरार हल्लेखोर हा आधीपासूनच दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होता.

साधारण शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही लोकल मुंब्रा रेल्वेस्थानकात आली. त्यावेळी वाडेकर यांच्या अंगावर एक प्रकारच्या सोल्युशनची नशा करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीने त्याच्याकडील रूमाल पेटवून फेकला. तो रूमाल वाडेकर यांच्या डाव्या हातावर पडला. आधी काय झाले हे वाडेकर यांच्या लक्षात आले नाही. तेव्हा आग लागल्याचा प्रकार त्यांना अन्य एका सहप्रवाशाने निदर्शनास आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली, तर रूमाल फेकणाऱ्याने मुंब्रा रेल्वेस्थानकात उडी घेऊन पोबारा केला.  

या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वाडेकर यांना दिवा रेल्वे स्थानकात उतरवून तातडीने  कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी कलम ३२६ नुसार ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू

रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.  हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पसार दिव्यांगाला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती कांदे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलPoliceपोलिस