शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कौटूंबिक कलहातून मद्यपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:25 IST

दारुच्या नशेमध्ये सिलेंडरचा स्फोट करुन आत्महत्येचा प्रयत्न करणारा रवींद्र रावत हा ८५ टक्के जळाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला वाचविण्यासाठी गेलेला एक पोलीस हवालदारही यात किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपोलिसांसमोर घडवला सिलिंडर स्फोटपत्नी माहेरी गेल्याने होता अस्वस्थ्रपोलीस हवालदारही जखमी

ठाणे : पत्नी मुलीसह माहेरी गेल्याच्या वैफल्यातून रविंद्र सिंग रावत (३७, रा. पुराणिक होम टाऊन, घोडबंदर रोड, ठाणे) याने दारुच्या नशेमध्ये सिलेंडरचा स्फोट करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. तो यात ८५ टक्के होरपळला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आलेले कासारवडवलीचे पोलीस हवालदार चौधरी हेदेखील यामध्ये किरकोळ जखमी झाले.नेहमीच्या भांडणाला कंटाळून रविंद्रची पत्नी लतिका ही सात वर्षांच्या मुलीसह दोन दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे तो अस्वस्थ होता. २५ जानेवारी रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुराणिक होम टाऊनच्या एका इमारतीमधील नवव्या मजल्यावर राहणाऱ्या रविंद्रसिंग याने दारुच्या नशेत धुमाकूळ घातल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धाडवे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. परंतू, तोपर्यंत त्याने घरातील स्वयंपाकाच्या सिलेंडरमधील गॅस लीक केला होता. या उग्र वासाने रहिवाशांनी तिथे गर्दी केली होती. एकीकडे रहिवाशांची गर्दी तर दुसरीकडे लायटर हातात घेतलेला रविंद्रसिंग हा दारुच्या नशेमध्ये तिथे होता. पोलिसांनी असे करु नको, हे विश्वासात घेऊन त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला. पण त्याने गॅस लीक केल्यानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास लायटर पेटविला. त्यामुळे स्फोट झाल्याने तो ८० ते ८५ टक्के भाजला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला वाचविण्यासाठी गेलेले हवालदार चौधरी हेही या घटनेमध्ये किरकोळ जखमी झाले. ठाणे अग्निशमन दलाच्या कापूरबावडी येथील जवानांनी शर्थीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोट