शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुथुट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला, 7 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:35 IST

उल्हासनगरातील घटना, सात जणांना अटक : दरोडेखोरांकडून पिस्तूल, तलवार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कॅम्प नं. ४ लालचक्की परिसरातील मुथुट फायनान्सवरील दरोड्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला असून, सात दरोडेखोरांना अटक करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, गॅसकटर, आदी साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुथुट फायनान्स कार्यालयातून मोठे घबाड हाती लागेल या आशेतून मुथुट फायनान्स शेजारील गाळा काही जणांनी भाड्याने घेऊन तेथे फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुकानाची व मुथुट फायनान्स कार्यालयाची एकच भिंत आहे. शनिवारी रात्री १२ नंतर फळांच्या दुकानात काही जणांच्या संशयास्पद हालचाली होत होत्या. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची गस्त घालणारी गाडी गेली. त्यावेळी त्यांनी दुकानात होत असलेल्या संशयास्पद हालचाली टिपून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या दुकानाचा अंदाज घेऊन पोलिसांनी आतमध्ये असलेल्यांना बाहेर येण्यास सांगितले.

पोलिसांनी आपल्याला घेरल्याचा अंदाज आलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने दुकानाचे शटर उघडले. पोलिसांनी जहीर अहमद, इमामुद्दीन कासीम शेख, जिजाऊ शेख, रामसिंग, काळू शेख, आदिम शेख अशा सातजणांना अटक केली. सर्व दरोडेखोर झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळ येथील आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, गॅसकटर, ऑक्सिजन गॅस सिलिंडर, हातोडे, आदी साहित्य जप्त केले. सर्व सराईत गुन्हेगार असून, देशाच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुथुट फायनान्स व फळाच्या दुकानाची भिंत एकच असल्याने चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर भगदाड पाडत असल्याचे उघड झाले.

मोठी माहिती मिळण्याची शक्यताविठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी देशात कुठे कुठे दरोडा टाकला याची माहिती घेतली जात असून, मोठी माहिती उघड करण्यात पोलिसांना यश येईल, असा माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. टी. टेळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस