शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पहाटेच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:27 IST

ठाण्याच्या नौपाडा भागातील एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकच नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरटयांनी ते फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देएटीएमची सुरक्षा ऐरणीवर नौपाडयातील घटनासुरक्षारक्षकच बेपत्ता

ठाणे : येथील गडकरी रंगायतनपासून जवळच असलेले ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ या बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न सोमवारी पहाटेच्या सुमारास झाला. ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने नौपाडा पोलिसांना ही माहिती दिली.नौपाड्यातील हे ‘एटीएम’ केंद्र पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न करूनही चोरट्यांना ‘एटीएम’ फोडता न आल्याने त्यांनी तिथून पलायन केले. काही वेळाने पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमधील एक सुरक्षारक्षक तिथे पैसे काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने त्याचवेळी नौपाडा पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव यांना ही बाब सांगितली. या ‘एटीएम’ केंद्राजवळ कोणताही सुरक्षारक्षक नसल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएमच्या जवळपास असलेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अजय गंगावणे हे अधिक तपास करत आहेत.* सुरक्षारक्षक नाही...पहाटे ज्यावेळी नौपाडा पोलिसांकडून बँकेच्या अधिकाºयांना एटीएमचोरीच्या प्रयत्नाबद्दल सांगण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकाच्या नेमणुकीचीही विचारणा पोलिसांनी केली. त्यावेळी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नेमण्याचे बँकेच्या तरतुदीमध्ये नसल्याची धक्कादायक बाब एका अधिकाºयाने सांगितल्याने पोलीसही अवाक झाले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी