शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:27 IST

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांना सिनेस्टाईल अटक

ठाणे : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाºयाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने सिनेस्टाईल बेड्या ठोकल्या. नुकतेच लग्न झालेल्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी या आरोपींनी दिली होती.ठाण्यातील सेनेच्या एका बड्या पदाधिकाºयाच्या मुलीचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. तुमच्या मुलीशी माझे प्रेम होते. तिचे लग्न झाल्याने मी निराश झालोय. तिच्यावर माझे पाच लाख रुपये खर्च झाले. ते परत न दिल्यास मुलीसोबतचे खासगी फोटो आणि चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी त्यात दिली होती. या पदाधिकाºयाने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आपली मुलगी निष्कलंक असल्याचे समजले. मात्र, त्यानंतरही मेसेजेस सुरू असल्याने, पदाधिकाºयाने ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आरोपीला पैसे देण्याची तयारी दर्शविली. ठरल्याप्रमाणे, २१ एप्रिल रोजी रात्री तक्रारदार अडीच लाखांची बॅग घेऊन पालीकडे रवाना झाले. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये मेसेजेसमधून संवाद सुरू होता. पैसे पाठवण्यासाठी आरोपीने पालीजवळील आमडोशी फाट्याजवळच्या फलकाचे छायाचित्र पाठवत तेथे बॅग ठेवण्याचे सांगितले. शनिवारी ७.३०च्या सुमारास तेथे बॅग ठेवून तक्रारदार रवाना झाले. खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी आधीच दबा धरून बसलेले होते. ८च्या सुमारास दोघे त्या फलकाजवळ काही वेळ घुटमळले. एकाने बॅग उचलताच, दबा धरलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.झटपट श्रीमंतीचा मार्गसुशांत तेलंगे आणि शुभम गोळे अशी त्यांची नावे आहेत. सुशांत रोहा तालुक्याचा, तर शुभम नागोठण्याचा आहे. दोघांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी खंडणी उकळण्याचा कट त्यांनी दोन महिन्यांपूर्वी रचला होता.

टॅग्स :Crimeगुन्हा