शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वॉटर पार्क व्यवस्थापकाला मारहाणप्रकरणी मनसेच्या १५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:21 IST

दोन मराठी कामगारांना कामावरुन काढल्याचा जाब विचारत ठाण्यातील सूरज वॉटर पार्कमधील सीसीटीव्हींची मोडतोड करीत यवस्थापक लक्ष्मण कटींना मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा समावेशदोन मराठी कामगारांना काढल्याचा रागकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: दोन मराठी कामगारांना कामावरुन तडकाफडकी काढल्याचा जाब विचारुन सूरज वॉटर पार्कचे व्यवस्थापक लक्ष्मण कटी यांना मारहाण करणारे मनसेचेठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कमधील शिवाजी हेलाले आणि पुरंदर पाटील या दोन मराठी कामगारांना कामावरून अलिकडेच काढले होते. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील १५ ते २० कार्यकर्ते 30 नोव्हेंबर रोजी सूरज वाटर पार्क येथे गेले होते. त्यावेळी ‘आमच्या माणसांना काढता तुम्ही’ असे म्हणत त्यांनी सूरज वाटर पार्कच्या कार्यालयात तोडफोड केली. सीसीटीव्हीचीही तोडफोड करीत व्यवस्थापक कटी यांच्या श्रीमुखात लगावली. शिवाय त्यांना बघून घेण्याची धमकीही दिली. याप्रकरणी वाटर पार्कचे पर्यवेक्षक सागर यादव यांनी रविवारी (१ डिसेंबर रोजी) कासारवडवली पोलीस ठाण्यात मारहाण आणि धमकी दिल्याची अविनाश जाधव, मंजुळा डाकी आदींसह २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

‘‘ सूरज वॉटर पार्कच्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याच्या मुद्दयावरुन अविनाश जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी व्यवस्थापकाला जाब विचारत मारहाण केल्याचा गुन्हा रविवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, परिमंडळ ५ 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी