शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

छटपूजेला चाललेल्या कुटुंबावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 03:07 IST

तिघे जखमी : घरातील वस्तूंची नासधूस

ठाणे : छटपूजेसाठी पहाटे चाललेल्या जितेंद्र माली (३१) यांच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने हल्ला करून, त्यांच्यासह त्यांची पत्नी व मेहुणी यांना मारहाण करत सागर दळवी याने जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील वस्तूंची नासधूस केल्याची घटना सावरकरनगर परिसरात घडली. दळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली नसल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

सावरकरनगर येथील कृष्ण वृंदावन सोसायटीतील रहिवासी माली हे मूळ बिहारचे आहेत. तसेच ते पत्नी नेहा, मुलगी नव्या आणि मुलगा ऋषभ यांच्यासह मागील सहा वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत आहेत. त्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारा सागर दळवी हा मागील तीनचार दिवसांपासून येताजाता विनाकारण त्यांना शिवीगाळ करीत होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने माली कुुटुंबाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास छटपूजेच्या निमित्ताने माली हे पत्नी नेहा, मेहुणी प्रमिला आणि दोन मुलांसह उपवन तलाव येथे जाण्याकरिता तयारी करत होते. त्यावेळी दळवी हा नशेत आला व त्याने आईबहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माली यांनी त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगून दरवाजा बंद केला. त्यानंतर दळवीने दरवाजावरील असलेल्या मोकळ्या जागेतून घरात विटा फेकल्या. तसेच जोरात लाथ मारून घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.त्याच्याकडील लाकडी दांडक्याने जितेंद्र यांच्या डोक्यावर, पाठीवर व उजव्या हातावर मारहाण केली. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पत्नी व मेहुणी यांनाही त्याने दांडक्याने मारहाण केली. यामध्ये पत्नी नेहा हिच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे तर, मेहुणी प्रमिला हिच्या डोक्याला व पायाला दुखापती झाली असून डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी