शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:37 IST

डोंबिवली पूर्वेतील घटना : कापडविक्रेता गंभीर जखमी, गुन्हा दाखल

डोंबिवली : पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच या जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. पूर्वेकडील रेल्वेस्थानकानजीक असलेल्या शिवसेना शाखेसमोर पदपथावर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात सलाउद्दीन सिद्दीकी शेख याने जाफर अली इंद्रिसी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बेदम मारहाणीत इंद्रिसी गंभीर जखमी झाले असून सोमवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सलाउद्दीनवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केडीएमसीतील ‘फ’ प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे १५० मीटर परिक्षेत्रात असणाºया स्कायवॉकवर फेरीवाले आणि भाजीविक्रेते दिवसाढवळ्या बिनदिक्कत ‘बाजार’ मांडत आहेत. याठिकाणीही बसण्याच्या जागेवरून शनिवारी दोघांत जुंपल्याचा प्रकार घडला होता.डोंबिवली पूर्वेला सोमवारचा बाजार भरतो. यानिमित्त आठ ते दहा वर्षांपासून कुर्ला येथे राहणारे जाफर अली हे याठिकाणी कपडेविक्रीसाठी येतात. सोमवारी ते आले असता बसण्याच्या जागेवरून अन्य कपडेविक्रेता सलाउद्दीन शेख याने अली यांच्याशी वाद घातला. यानंतर, शेख याने हल्ला करत अली यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच जवळ असलेल्या फरशीने अली यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि छातीवर प्रहार केला. यात अली हे गंभीर जखमी झाले. अन्य फेरीवाले अली यांच्या मदतीला धावले आणि सलाउद्दीनच्या मारहाणीतून त्यांची सुटका केली.

गंभीर जखमी झालेल्या अली यांना प्रारंभी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पण, त्यांना जादा मार लागल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या ते बेशुद्धावस्थेत असून सलाउद्दीन मारहाणीच्या घटनेनंतर पसार झाला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरीफेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा नेहमीच वादाचा राहिला असताना दुसरीकडे परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सोमवारच्या घटनेतून उघड झाली. मुंब्रा व अन्य भागांतून मोठ्या प्रमाणावर फेरीवाले व्यवसायासाठी कल्याण-डोंबिवलीत येतात. यातील बहुतांश गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्याकडून नेहमीच स्थानिक फेरीवाल्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असतात. सलाउद्दीन शेख हा वांद्रा तर गंभीर जखमी झालेले जाफर अली कुर्ला येथील रहिवासी आहेत.पथक रमले गप्पांमध्येफेरीवाल्यांवरील कारवाईचा विषय येतो, तेव्हा निवडणूक कामात व्यग्र असल्याचे कारण फेरीवालाविरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी देतात. पण, सोमवारी सायंकाळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ते गप्पांमध्ये रमल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमण मनाई केलेल्या हद्दीतील पूर्वेतील उर्सेकरवाडीमध्ये पाहायला मिळाले. आता जीवघेण्या हल्ल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.