शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Hiran Mansukh:ATS:हिरन मनसुख मृत्युप्रकरणी एटीएसने दाखल केला खूनाचा गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: March 8, 2021 11:07 IST

आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय मनसुख यांची पत्नी विमला यांनी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान केला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे मनसुख हिरण मृत्यु प्रकरणाला कलाटणीठाण्यातील निवासस्थानापासून एटीएसची तपासाला सुरुवात मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीपाशी स्फोटके ठेवण्याकरिता वापरलेल्या मोटारकारच्या मालकाचा शुक्रवारी गूढ मृत्यु झाल्याचे आढळले. दरम्यान, आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय मनसुख यांची पत्नी विमला यांनी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान केला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.हिरन यांच्या मृत्युचा मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनीशुक्र वारी केली. त्यापाठोपाठ या घटनेच्या तपासासाठी शुक्र वारपासूनच एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सुरु वात केली. शनिवारी तसेच रविवारीही या अधिकाऱ्यांनी मनसुख यांच्या ठाण्यातील ‘विकास पाम’ या इमारतीमधील त्यांच्या कुटूंबियांकडे चौकशी केली. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने सुमारे साडे तीन तास केलेल्या चौकशीमध्ये मनसुख यांची पत्नी विमला तसेच मोठा मुलगा मित यांच्यासह कुटूंबियांनी मनसुख यांच्या मृत्युबद्दल संशय व्यक्त करीत खूनाचा आरोप केला. त्यांची गाडी चोरीला गेल्यानंतरही त्यांनी एटीएसला संपूर्णपणे सहकार्य केले होते. मग, तरीही रात्री ८ वाजता त्यांना आलेला फोन कॉल कोणाचा होता? त्यानंतर ते तावडे साहेबांचे नाव सांगत ठाण्यातील घोडबंदर रोडला कोणाकडे गेले? रात्री १० नंतर त्यांचा फोन बंद आला. पुढे दुसºया दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मिळाला. हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असून चांगले स्वीमर असलेले मनसुख हे आत्महत्या करुच शकत नाही, असा दावा करीत या कुटूंबियांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करुन अखेर पत्नी विमला यांच्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दहशतवादविरोधी पथक, मुंबई येथे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत सर्व कागदपत्रेही एटीएसच्या अधिकाºयांनी रविवारी मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचेही एटीएसच्या एका अधिकाºयाने सांगितले.* मास्कच्या आत रुमाल मिळाल्यानेही गूढ वाढलेमुंब्रा रेतीबंदर येथील खाडीतून मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, त्यावेळी त्यांच्या तोंडाला असलेल्या मास्कच्या आत काही रु माल मिळाले. हा मृतदेह पूर्णपणे चिखलाने भरलेला होता. रु माल मात्र मास्कच्या आत असल्यामुळे ते चांगल्या स्थितीत होते. हे रु माल मनसुख यांच्या तोंडाला कोणी लावले? ते त्यांनी स्वत: लावले की अन्य कोणी? यावरु न अनेक तर्क वितर्ककेले जात आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी