शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींचा भाव देशाला परमवैभवापर्यंत नेऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:01 IST

देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे हा जो भाव अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे.

ठाणे : देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे हा जो भाव अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे. तो घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा परमवैभवापर्यंत नेऊ शकतो, असा आशावाद मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंत्ती निमित्त भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी स्वरवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भावना यावेळी व्यक्त केली. भरी दोहपहरी मे अंधियारा... सुरज परछाईसे हारा...अंतर तमका नेह निचोडे, बुझी हुई बाते सुलगाये... आओ फिर से दिया जलाये... आओ फिर से दिया जलाये अशी अटलजींच्या कवितेच्या ओळी सादर करून पुन्हा परमवैभवापर्यंत नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.देशाला एक दिशा देण्याचे काम अटलींजीनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. कवी मनाचे अटलीजी कोमल हृदयाचे होते. परंतु, देशासाठी संकटे आल्यास ते कठोर निर्णय घेण्यासही मागे पुढे पाहत नव्हते. ज्या वेळेस देशाला हिंदू ग्रोथ रेट म्हणून हिणवले जात होते, त्यावेळेस अटलीजींनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र