शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: April 5, 2024 16:38 IST

Jitendra Awhad : "कोसा भागात ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता."

ठाणे :  मुंब्रा, कौसा भागात ११ वर्षापूर्वी लकी कंपाऊंड इमारत दुर्घटना घडली होती. या घटनेत तब्बल ७४ जणांचा जीव गेला होता. परंतु या घटनेला आज इतके वर्ष उलटल्यानंतर त्यातून काही तरी शिकायला हवे होते. परंतु पालिकेचे अधिकारी काही शिकायलाच तयार नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  

या भागात आजही  अवघ्या चार - चार दिवसात स्लॅब भरले जात असून ही किमया स्थानिक बिर्ल्डर करुन दाखवत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आपण आता आणखी एका नवीन लकी कंपाऊंड दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत या बांधकामांवरुन संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ही टीका केली आहे.

कोसा भागात ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला. अनेकजण तुरूंगात गेले. या घटनेनंतर जवळपास ८ वर्षे मुंब्रा, कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभे राहिले नव्हते. आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवे होते. पण, अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या चार - चार दिवसात स्लॅब भरणे हे एल अँड टी ला शक्य नाही. ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत,  असेच हे सर्व पाहून वाटते. आज ना उद्या मरणारच आहेत तर हे इमारतीच्या ढिगाºयाखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगर पालिकेच्या अधिकाºयांची झाली आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.आयुक्त नवीन आहेत, त्यांना काही समजण्याच्या आत कामे पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत. परंतु ठाणे महापालिकेचे आताचे

आयुक्त सौरभ राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसेच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच, खालच्या अधिकाºयांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचे नुकसान होईल. वाचवायला कुणीच येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेPoliticsराजकारण