शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

सहाय्यक आयुक्तांना मनसे पदाधिकाऱ्याची शिवीगाळ, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:43 IST

सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मनसे पदाधिका-याने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने बुधवारी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले.

उल्हासनगर : सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मनसे पदाधिकाºयाने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने बुधवारी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.उल्हासनगर महापालिकेने लोकसभा निवडणुका पार पडताच अवैध बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली. मंगळवारी असंख्य अवैध बांधकामे पोलीस संरक्षणात जमिनदोस्त केली. याप्रकरणी दोघांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हाही दाखल केला. त्यापुर्वी सोमवारी हिराघाट ते गुरूद्वारा रस्त्याचे रूंदीकरण करून २५ पेक्षा जास्त दुकानांवर पालिकेने पाडकाम कारवाई केली. या प्रकाराने अचानक प्रकाशझोतात आलेल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी पाडकाम कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले. महापालिकेच्या कारवाईने भूमाफियांचे दाबे दणाणले असून, बुधवारीही पोलीस संरक्षणात पक्क्या बांधकामांवर पाडकाम करवाई होणार होती; मात्र मंगळवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्यासोबत शिविगाळ करण्याचा प्रकार झाल्याने त्याला ब्रेक लागला.अवैध बांधकामाचा अहवाल पालिकेत देण्यासाठी गेलेल्या गणेश शिंपी यांची गाठ मंगळवारी दुपारी मनसेचे विभाग प्रमुख योगिराज देशमूख यांच्याशी पडली. अवैध बांधकामावरून देशमुख यांनी शिंपी यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांना महापालिका मुख्यालयात शिविगाळ केली. शिंपी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीसांनी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. योगिराज देशमुख यांनीही शिंपी यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रत्येक वेळी महापालिका कर्मचारी व अधिकाºयांना होणाºया मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी बुधवारपासून पेन डाऊन आंदोलन करून कठोर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली.महापालिकेची सुरक्षा व्यवस्था कूचकामीमहापालिका अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण, शिवीगाळ यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यानिषेधार्थ किती दिवस आंदोलन करणार, असा प्रश्न अधिकाºयांकडून विचारला जात आहे. पालिकेत ८० टक्के वर्ग-१ व २ ची पदे रिक्त असून कनिष्ठ कर्मचाºयांकडे वर्ग-१ व २ चा पदभार दिल्याने, पालिकेत सावळागोंधळ निर्माण झाला आहे. महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMNSमनसे