शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:47 IST

अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ  - अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाने नगराळे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी मतदारसंघाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व हे पूर्वीपासून होते. मात्र वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड सर्वांची होती. त्यातच गेल्यावेळेस दिलेल्या उमेदवाराबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवार आत्ताच निश्चित करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गेल्या निवडणुकीचा अहवाल पाहता राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते ही काँग्रेसने मिळवलेली आहेत. त्यामुळे पुढील विधानसभेच्या निवडणुकीत अंबरनाथची जागा ही काँग्रेससाठीच मागायची असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण ताकद देण्यासाठी पक्षाने देखील योग्य सहकार्य करावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या आढावा बैठकीनंतर नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने मतदारसंघांची चाचपणी सुरू केल्याचे मान्य केले. पक्षाला अपेक्षित असलेली सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. अंबरनाथमधील पदाधिकाºयांशी चर्चा केल्यावर कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी तयार आहेत. ही जागा काँग्रेस लढवणार हे निश्चित असले तरी आघाडी करण्याची वेळ आली तर त्यावेळेस मागील निवडणुकीचा आकडा पाहून ही जागा काँग्रेसकडे कशी राहिल या संदर्भात अहवाल पाठवला जाणार आहे.काम केल्यास परिवर्तन घडेलअंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कॅप्टन निलेश पेंढारी, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून हे काम तळागळापर्यंत कसे पोहचवता येईल यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राला उल्हासनगर महानगरपालिकेतील २२ प्रभाग जोडण्यात आले असून त्या भागातही काँग्रेस आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांन सांगितले. या मतदारसंघात योग्य प्रकारे काम केल्यास या ठिकाणी परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस