शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

काल्हेर ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्ती कामांना अखेर सुरुवात

By नितीन पंडित | Updated: June 24, 2023 16:18 IST

माजी उपसरपंच सुमित म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी: काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीस व डांबरीकरण कामास अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबई मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही सुमित म्हात्रे यांना देत दिवाळी ननंतर या रस्त्याचे कंक्रेटीकरणं करण्यात येईल असे आश्वासन दिले होते

अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे गुंदवली,मानकोली,ताडाळी,कामतघर,वळ,पूर्णा,दापोडेया गावांसह काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुर फाटा काल्हेर ठाणे मार्गावरून प्रवास करताना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नागरिक काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याचा वापर करतात. मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या पाईपलाईनच्या मार्गावर प्रचंड खड्डे पडले होते या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपायुक्त विशेष अभियांत्रिकी चक्रधर कांडलकर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माळवदे, उप जलअभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सुमित म्हात्रे यांनी काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

काल्हेर ते ताडाळी मार्गिकेतील या ५.६ कि.मी. रस्त्याचे १२ इंच मापाप्रमाणे कॉंक्रीटीकरण करणे, रस्त्याचे संवर्धनाच्या दृष्टीने वाहतुकीसाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देणे, रस्त्यादरम्यान असणारे पूल व मोर्‍या अतिशय कमकुवत झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करणे यासंदर्भात चर्चा व लेखी मागणी करण्यात आली होती.म्हात्रे यांच्या मागण्यांची दखल घेत अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.