शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:34 IST

जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे.

पालघर: २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असून पालघरची जनता या पोटनिवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब करेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची नियोजनबध्द व्यूहरचना तयार करण्याकरिता चव्हाण स्वतः पालघरमध्ये दाखल झाले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पालघरच्या वाघोटे गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशपातळीवर भाजप आणि मोदींविरोधात जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत असंतोष आहे. जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे. पालघरमध्ये आदिवासींवर होणारे अत्याचार, बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकावणे, कुषोषणाचे बळी, प्रचंड प्रमाणात सुरु असेलला भ्रष्टाचार, समृध्दी महामार्गासाठी बळजबरीने सुरु असलेले भूसंपादन यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली उमेदवारांची पळवापळवी यातून या पक्षांना कोणतीही नैतिकता राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पालघरवासीय या मस्तवाल झालेल्या सत्ताधा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते निकराने आणि त्वेषाने ही लढाई लढतील, असा निर्धार काँग्रेस चव्हाणांनी व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस या लढाईत सहभागी होईल असा निर्वाळा दिला. दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार दामू शिंगडा, आ. भाई जगताप, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमिणीक डिमेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रमाकांत म्हात्रे, सचिव मनिष गणोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निलमताई राऊत, दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष,  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस