शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

चिन्ह मिळताच 'तुतारी'च्या निनादात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव

By अजित मांडके | Updated: February 23, 2024 14:47 IST

लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे.

ठाणे :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने "तुतारी" हे चिन्ह दिले आहे. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले. तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आज पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  महिलाध्यक्षा सुजाताताई घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळेस कार्यकर्त्याकडून "वाजता तुतारी... गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची,  तुतारी वाजवणार.. गद्दारांना गाडणार , अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे. आता तुतारी हेच चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असून आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असे या प्रसंगी सुहास देसाई यांनी सांगितले. तर, विक्रम खामकर यांनी, तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे. कारण, जी चिन्हे मागितली होती; त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालविणे अधिक सोपे झाले आहे, असे सांगितले. 

दरम्यान, यावेळेस मा.नगरसेविका आरती गायकवाड,विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,युवती अध्यक्षा पल्लवी जगताप,व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय,आरोग्य सेलचे अध्यक्ष आसद चाऊस,कार्याध्यक्ष सुभाष यादव,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस