शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसल्याने माज दाखवू नका, उदय सामंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 05:34 IST

तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा मंत्री असा लोकशाहीत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही.

ठाणे  :

तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा मंत्री असा लोकशाहीत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही. त्यामुळे सत्तेचा उन्माद व माज कुणीही दाखवू नये, हे मागील अडीच वर्षांत विरोधकांना जाणवले असेल. त्यामुळे जितका काळ तुम्ही सत्तेवर असाल तितका काळ तुम्ही जनतेकरिता काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील उद्योजकांना विकासाकरिता ताकद देणारा मुख्यमंत्री मिळावा याकरिता आम्ही राजकीय पाऊल उचलले, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केेले.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस यात्रा याचा प्रारंभ सामंत यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले की, आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमाला जात नव्हते. मी सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. उद्योजकांचे प्रश्न मंत्रालयातील अँन्टी चेंबरमध्ये बसून सोडविण्यापेक्षा मीच उद्योग मंत्रालय घेऊन तुमच्याकडे आले पाहिजे. हीच संकल्पना राबवायला सुरुवात केल्याचे त्यांनी  सांगितले. 

सामंत म्हणाले की, सरकार उद्योग सवलती देते तेव्हा मेहरबानी करीत नाही. पुढील मार्चअखेरपर्यंत उद्योगांना सवलती दिल्या जातील. महाराष्ट्रातील जे उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. शासनाचा उद्योग विभाग तुमच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. इंडोनेशियातील सिनारमनस कंपनीचा प्रकल्प रायगडला येणार आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारकडे कंपनी सुरू करण्यासाठी ३७ कोटी जमा केले होते. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र बैठक बोलावण्याकरिता त्या वेळेच्या मंत्र्यांना वेळ मिळत नव्हता. मात्र आम्ही तातडीने त्यांना सहकार्य केले. उपसमितीची बैठक बोलावून २५ हजार ३६८ कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली. दर तीन महिन्यांनी उपसमितीची बैठक होणार असल्याची हमी त्यांनी दिली. मोठ्या उद्योगांना कर्ज द्यायचे आणि नव्या उद्योजकांना कर्ज द्यायचे नाही, ही बँकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही सामंत म्हणाले.

मागील सरकारात अनुदानासाठी द्यावा लागत होता कटराज्य सरकारकडून उद्योजकांना मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी कट द्यावा लागत असून, तो देणे उद्योजकांना शक्य नसल्यामुळे गेली दोन वर्षे उद्योजकांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते, असा गंभीर आरोप महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केल्याने खळबळ उडाली. 

आता नवे सरकार आल्यानंतर परिस्थिती बदलली असून कोणत्याही ‘वजना’शिवाय उद्योजकांचे अनुदान जमा होत असल्याचे सांगत त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचे कौतुक केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत