शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

ठाणे महापालिकेने काढल्या १० दिवसांत तब्बल १५० निविदा; आचारसंहितेआधी धावपळ; अधिकाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामास जुंपले

By अजित मांडके | Updated: October 16, 2024 14:45 IST

मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबविण्याची धावपळ पालिकेत सुरू होती.

ठाणे : ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही गेल्या दहा दिवसांत गटार, पायवाटा, शौचालये बांधणे, रस्ते दुरुस्ती, समाजमंदिर आदींसह इतर कामांच्या १५० हून अधिक निविदा मागविल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबविण्याची धावपळ पालिकेत सुरू होती. 

पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. पालिकेवर १२०० कोटींच्या आसपास दायित्व आहे. आधीच्या कामांचे ठेकेदारांचे ३०० कोटींच्या आसपास देणी बाकी आहेत.  शासनाच्या निधीवरच पालिकेत विकासकामे सुरू आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांना  खुश करण्याचे काम शासनाकडून येणाऱ्या आदेशाच्या माध्यमातून केले. निवडणुकीचे बिगुल १२ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घोषित होणार हे लक्षात घेऊन शासनाकडून १४ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत पालिकेकडे कामांचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१० व ११ ऑक्टोबरला ५५ निविदा प्रसिद्ध यापूर्वी एखाद्या कामाचे राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरही त्या कामाची फाईल तयार होऊन निविदा प्रक्रिया अंतिम करण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जात होता. परंतु मागील १५ दिवसांत आलेल्या शासन आदेशांची तत्काळ अंमलबजावणी करून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. गेल्या १० दिवसांत तब्बल १५० हून अधिक निविदा मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० आणि ११ ऑक्टोबर या दोन दिवसांतच ५५ निविदा मागवण्यात आल्या. पालिकेतील अधिकारी या कामांसाठी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत कामांत जुंपले होते. 

अधिकाऱ्याने दिवसभरात केल्या एक हजार सह्यासार्वजनिक बांधकाम विभाग हा महत्त्वाचा मानला जातो. पालिकेतील या विभागातील एका अधिकाऱ्याने एका दिवसात तब्बल एक हजाराच्या आसपास प्रस्तावांवर सह्या केल्या. मागील पाच ते सात दिवसांत रोजच्या रोज ५०० ते ७०० प्रस्तावांवर सह्या केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १५ ऑक्टोबरला सकाळच्या सत्रात या अधिकाऱ्याच्या टेबलावर १५० च्या आसपास प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित होते.

निविदा काढल्या, बिलांचे काय?विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेने काढलेल्या १५० निविदांची कामे आचारसंहितेनंतर सुरू होतील. परंतु काम केल्यानंतर ठेकेदारांची बिले निघणार का, असा सवाल विचारला जात आहे. शासनाकडून कामांना निधी मंजूर झाला तरी १०० टक्के निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता आली तर उर्वरित निधी मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका