शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:31 IST

Dombivali Crime News: पूर्वेकडील खोणी पलावाच्या हद्दीत एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दोघांकडून दाेन लाख ३२ हजार रुपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

डोंबिवली - पूर्वेकडील खोणी पलावाच्या हद्दीत एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दोघांकडून दाेन लाख ३२ हजार रुपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. आर्शद करार खान आणि शादाबुद्दीन मोईनुद्दीन सय्यद (दोघांचे वय २८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाइल फोन आणि दोन लाख २३ हजार ४०४ रुपयांची रक्कम असा एकूण पाच लाख ३० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

दोघेजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार, अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम चोपडे, तारमळे यांचे पथक रवाना झाले. अमली पदार्थ विक्री करणारे पलावा सिटी गेट नंबर दाेन येथे आल्याची माहिती मिळताच दोघांना सापळा लावून अटक केली . 

    अटक केलेला आर्शद हा पलावा फेज टू मधील फाउंटना येथे राहतो तर शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे.     आर्शद याच्यावर मुंब्रा पोलिस ठाणे आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यात एमडी पावडर बाळगल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तो अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे.

एमडी पावडर पुरवठ्याचे राजस्थान कनेक्शन?    शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे. त्यामुळे तो आर्शदला एमडी पावडरचा माल आणून द्यायचा का? तो राजस्थानहून माल आणायचा का, याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी