शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 22:41 IST

विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून आकाश मोरे (२७) या तरुणाचा ठाण्यातील पडवळनगरमध्ये दिवसाढवळया गणेश रेड्डी (२९) याने खून केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली. खूनी गणेशला श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच अटक केली आहे.

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांनी केली कारवाईठाण्याच्या पडवळनगरमधील दिवसाढवळ्या थरारनाटयचाकूने पोटावर वार करुन केली हत्या

ठाणे: बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून आकाश मोरे उर्फ ब्लॅकी (२७, रा. भिमनगर, वर्तकनगर, ठाणे) याचा खून करणा-या गणेश रेड्डी (२९, रा. पडवळनगर, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच मंगळवारी अटक केली. अनेक वेळा इशारा देऊनही आकाशने दुर्लक्ष केल्यानेच आपण त्याचा खून केल्याची कबुली गणेशने पोलिसांना दिली आहे.मोरे आणि रेड्डी कुटूंबीय हे पडवळनगर भागातच वास्तव्याला आहे. गणेशची बहिण विवाहित असून तिला दोन मुलीही आहेत. तरीही एका खासगी बँकेत शिपाई असलेला आकाश हा नेहमी तिच्यामागे असायचा. त्यांच्यात अनैतिक संबंध असावेत, असा गणेशला संशय होता. त्यामुळेच त्याने बहिणीशी संबंध न ठेवण्याबाबत आकाशला वारंवार इशारा दिला होता. मात्र, तरीही तो ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पडवळनगर येथे जय मल्हार इमारतीच्या बाजूला असलेल्या गणेशच्या बहिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी आला होता. याच रागातून गणेशने भाजी कापण्याच्या सुरीने तिच्या घरासमोरच त्याच्या पोटात चाकूचे दोन वार केले. त्याचा हा वार इतका जीवघेणा होता की, आकाश तिथेच रक्ताच्या थारोळयात कोसळला. तिथे जमा झालेल्या काही नागरिकांनी त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि दिनकर चंदनकर यांच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच तिथून पसार झालेल्या गणेशला अटक केली. श्रीनगर पोलीस ठाण्यात गणेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने खुनासाठी वापरलेल्या चाकूचाही शोध घेण्यात येत असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून