शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोंंबिवलीतून १२ लाख ९१ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:08 IST

डोंबिवलीतील एका व्यापा-याची रोकड त्याच्या नोकराकडून लुटणा-या चौघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाची कारवाई अवघ्या तीन दिवसात मिळाले आरोपीव्यापा-याच्या नोकराने दिली लुटारुंना रकमेची माहिती

ठाणे: डोंबिवलीतील एका स्टील व्यावसायिकाची १२ लाख ९१ हजारांची रोकड लुटणा-या अमोल लोखंडे (२६, रा. उल्हासनगर), विजय अय्यर (२६, बदलापूर), गणेश झेंडे (२६, बदलापूर) आणि गुरिप्रत सिंग (२३, बदलापूर) या चौघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजारांची रोकड आणि जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा १३ लाख सात हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांनी सांगितले.मानपाडा येथील एका स्टीलच्या व्यापाºयाला गिºहाईकाने दिलेली १२ लाख ९१ हजारांची रोकड घेऊन त्यांचा नोकर २६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास स्कूटरवरुन कल्याण शीळ रोडने काटई टोल नाक्यावरुन जात होता. ही रोकड स्कूटरच्या हँडलला अडकवून जात असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या विजय अय्यर आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीला लाथ मारुन त्याला पाडले. दुचाकीवरुन तो खाली पडल्यानंतर या टोळक्याने दुचाकीच्या हँडलला लटकवलेली रोकडची पिशवी घेऊन अन्य एका दुचाकीवरुन पलायन केले. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा समांतर तपास ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाकडूनही सुरु होता. हा प्रकार अमोल लोखंडे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची टीप उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांना मिळाली होती. त्यामुळे तक्रारदार व्यापाºयाकडे काम करणाºया लोखंडे याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी कसून चौकशी केली. सुरुवातीला आपण त्या गावचेच नसल्याचा त्याने आव आणला. नंतर मात्र त्याला बोलते केल्यानंतर आपल्या इतर साथीदारांना पैसे लंपास करण्यासाठी टीप दिल्याची त्याने कबुली दिली. त्याने इतर तिघांची नावेही दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक गायकवाड आदींच्या पथकाने त्यांना अटक करुन लुटीतील ११ लाख ५७ हजारांची रोकड आणि लुटीसाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. चौघांनाही ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा