शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात व्यवसायासाठी सुटटया पैशांची आवश्यकता असल्याचे भासवून रोकड लंपास करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 23:33 IST

दुकानासाठी सुटया पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलीवरी करणाऱ्यांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फैय्याज उस्मान मेमन यास नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीरिक्षाही केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नव्यानेच सुरु केलेल्या दुकानासाठी सुटया पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलीवरी करणाºयांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फैय्याज उस्मान मेमन (२९, रिक्षाचालक, रा. जोगेश्वरी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त करण्यात आली असून त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.लोकमान्यनगर येथील रहिवाशी प्रदीप गुणाजी गराटे (५४) हे त्यांच्या साक्षीदारासह ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या नौपाडयातील भास्कर कॉलनी येथील किराणा दुकानात त्यांच्या एजंसीच्या मालाची डिलेविरी देण्यासाठी आले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना नौपाडा परिसरात नव्याने दुकान सुरु केल्याची बतावणी केली. या दुकानातही त्यांना मालाचा भरणा करायचे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याच परिसरातील ‘श्री मांगल्य’ या इमारतीमध्ये वास्तव्याला असल्याचीही बतावणी करुन व्यवसायासाठी सुट्टया पैशांची निकड असल्याचे भासविले. त्यांच्याकडे मालाच्या डिलीवरी करतांना जमा झालेली ३६ हजारांची रोकडही त्यांच्याकडून घेतली. त्या बदल्यात बंदे पैसे त्याच्या वडीलांकडून घेण्यासाठी प्रदीप आणि त्याच्या साथीदाराला ‘श्री मांगल्य’ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाठवून ते दोघेही तिथून पसार झाले होते. त्यानंतर प्रदीप यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी फसवणूकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेºयामधील चित्रणाची पाहणी केली. तेंव्हा फसवणूक करणाºयाचा आणखी एक साथीदार रिक्षा घेऊन आल्याचे आढळले. त्याच रिक्षातून दोघेही पळून गेल्याचे उघड झाले. याच सीसीटीव्हीतील फूटेजच्या आधारे तसेच परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत रिक्षाचा क्रमांक मिळवून फैय्याज मेमन या रिक्षा चालकाला १४ सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली. त्याने या लुटीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी