शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुन्हेगार विकी भोसलेला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:35 IST

एका खूनाच्या प्रयत्नामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पसार झाल्यानंतर विक्रांत उर्फ विकी भोसले (३०) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईतीन वर्षांनंतर झाली अटक श्रीनगर पोलीस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल

ठाणे : कुख्यात गुन्हेगार विक्रांत ऊर्फ विकी भोसले (३०, रा. किसननगर, ठाणे) याला एका खुनाच्या प्रयत्नामध्ये ठाणे खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विकी तसेच त्याचे साथीदार संतोष पवार, दर्शन अशा चौघांनी २२ आॅक्टोबर २०१५ रोजी ठाण्याच्या आयटीआय सर्कल, रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट येथे एका वीसवर्षीय तरुणावर तलवार आणि चाकूने खुनी हल्ला केला होता. यात त्याच्या डोक्याला आणि हाताच्या बोटांवर गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या चौघांविरुद्ध दाखल झाला होता. संतोष आणि दर्शन या दोघांना श्रीनगर पोलिसांनी आॅक्टोबर २०१५ रोजी अटक केली होती. मात्र, विकी भोसले हा पोलिसांना हुलकावणी देत होता. तो १३ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाण्याच्या बाळकुम-साकेत पाइपलाइन भागात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून त्याला बाळकुम भागातून अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात हाणामारी, खुनाचा प्रयत्न असे तीन गुन्हे, तर खेड (रत्नागिरी) येथे दोन असे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचाही एका गुन्ह्याचा समावेश असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक बी.पी. बनसोडे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक