शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात इफेड्रिनची तस्करी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 20:46 IST

ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे सापळा लावून अंकुश कसबे याला सहा लाखांच्या इफेड्रीनसह अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तठाणे पोलिसांची कामगिरी टेंभी नाका येथील केली अटक

ठाणे : इफेड्रिनची तस्करी करण्यासाठी आलेल्या अंकुश कचरू कसबे (३०, रा. महात्मा फुलेनगर, उल्हासनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून इफेड्रिनसह सहा लाख २२ हजार ६०० चा मुद्देमाल जप्त केला आहे.येथील टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे खैरनार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी रात्री ८.४५ वा. च्या सुमारास अंकुश याला जांभळीनाक्याकडून टेंभीनाक्याकडे जाणा-या रस्त्यावर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा लाख २० हजार रुपये किंमतीचे १५५ ग्रॅम इफेड्रिन, रोकड आणि मोबाइल असा सहा लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला. त्याच्याविरु द्ध नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याने हा अमली पदार्थ कोणाकडून आणला? तो कोणाला त्याची विक्री करणार होता? यात त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ