शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:19 IST

अनेक नगरसेवकांचे फोन बंद, घोडेबाजार तेजीत, आज अर्ज भरले जाणार

भार्इंदर : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार असून शिवसेनेच्या दोन नगरसेविका व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा थांगपत्ता लागत नसल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेने त्यांच्या नगरसेवकांना लोणावळा येथे हलवले असून भाजपचे नगरसेवक गोव्याला गेले आहेत. भाजपचे नगरसेवक फुटतील अशी धास्ती असतानाच सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्यात आल्याने घोडेबाजार तेजीत असल्याची चर्चा आहे.सोमवारी ३ ते ५ या वेळेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरायचे आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील व दीप्ती भट तर काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील व अमजद शेख बेपत्ता आहेत. त्यांचे फोन बंद असून अनिता, नरेश व अमजद हे भाजप नगरसेवकांसोबत गोव्याला असल्याची चर्चा आहे. शिवसैनिक पाटील व भट यांचा शोध घेत आहेत. काँग्रेसच्या सारा अकरम यांचा भ्रमणध्वनी बंद असला तरी त्या संपर्कात असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे. तर काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे.शिवसेनेच्या दोन नगरसेविका बेपत्ता असल्याने सेनेने शुक्रवारी रात्री आपल्या अन्य नगरसेवकांना खबरदारी म्हणून लोणावळा येथे हलवले आहे. काँग्रेसचे नगरसेवक मात्र मीरा रोडमध्येच आहेत. भाजपमध्ये महापौर व उपमहापौर पदांवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक रुपाली मोदी यांचे नाव आघाडीवर आसताना भाजपच्या नीला सोन्स यांनी स्पर्धेत उडी घेतल्याने मेहता व समर्थक नगरसेवकांना नीला यांच्या बाजूने कौल द्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे तसेच दौलत गजरेही स्पर्धेत असले तरी नीला मैदानात उतरल्याने त्याचे नाव चर्चेत आले आहे. परंतु हसनाळे ज्येष्ठ असल्याने त्यांना उमेदवारी देण्याची मागणी अनेक नगरसेवकांची आहे.उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक पाटील यांचे नाव मेहतांकडून निश्चित केल्याचे मानले जात असले तरी अनेक नगरसेवकांनी ध्रुवकिशोर यांच्या नावाला विरोध केल्याचे समजते. ज्येष्ठ नगरसेविका रिटा शाह, प्रभात पाटील, मदन सिंह, सुरेश खंडेलवाल, हसमुख गेहलोत, रवी व्यास, विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती आदी इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.नगरसेवकांनी केली कानउघाडणीज्येष्ठ व अनुभवींना डावलता. आतापर्यंत केवळ आश्वासनेच दिली गेली. नवीन आलेल्यांना मात्र महत्वाची पदे सतत दिली गेली अशी कान उघाडणी काही नगरसेवकांनी गोवा येथे केल्याचे समजते. उद्या अर्ज भरण्याची मुदत असल्याने भाजपमधील इच्छुकांना गोव्यातच अडकवून ठेवत ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस