शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:22 IST

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नोंदणीही केली आहे.

ठळक मुद्देवाहतूक स्वयंसेवक म्हणून करणार काम वाहतूक पोलिसांच्या टंचाईवर शोधला उपाय

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नोंदणीही केली आहे. संपूर्ण ठाणे आयुक्तालयातून स्वयंसेवकांची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना वाहतुकीच्या नियंत्रणाबरोबरच वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी लागत आहे. सध्या वाहतूक नियमनासाठीच या विभागाची कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळेच ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण या उपक्रमांतर्गत ज्या नागरिकांना वाहतूक शाखेसाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याची इच्छा आहे त्यांना ही सेवा देण्याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते. ठाणे आणि उल्हासनगरमध्ये वाहतूक शाखेने आवाहन करण्यापूर्वीच काही नागरिक स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. आता आवाहनानंतर उल्हासनगरमध्ये ४० शिक्षकांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत (आरएसपी) स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. आणखीही काही शिक्षकांसह नागरिक वाहतूक स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढे येत आहेत. उल्हासनगरबरोबरच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या चार विभागांमधील १८ युनिटमध्ये अशी नोंदणी सुरू आहे. किमान ४०० ते ५०० स्वयंसेवकांची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे.काय असणार उपक्रम...वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षेसंदर्भात स्थानिक पातळीवर जनजागृती, वाहतूक नियमनासाठी आठवड्यायातील किमान दोन तास वाहतूक शाखेला मदत करणे तसेच लोकसहभागातून वाहतूक नियमन व शिस्त राबविणे तसेच समाजाभिमुख कार्याची जाणीव निर्माण करणे हे काम हे स्वयंसेवक करणार आहेत.* नोंदणीसाठी प्रक्रियावाहतूक स्वयंसेवक या संकल्पनेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे. त्यानंतर त्यांनी सलग सहा महिने सेवा बजावल्यानंतर त्यांचा गौरव केला जाणार आहे.

 

 

सध्या उल्हासनगरमध्ये ४० शिक्षकांनी स्वयंसेवकासाठी तयारी दर्शविली आहे. इतरही ठिकाणी ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती पूर्ण होईल.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस