शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धान्यवाटपात मनमानी : शिधावाटप दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:36 IST

तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे

ठाणे : शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात मनमानी करणाऱ्या ठाणे येथील दोन व वाशी येथील एक अशा तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे येथील शिधावाटप ‘फ’ परिमंडळाचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली.शिधावाटप ‘फ’ परिमंडळाच्या नियंत्रणाखाली १३ दक्षता पथके कार्यरत आहेत. त्यांनी शिधावाटप दुकानांच्या विरोधातील तक्रारीनुसार केलेल्या तपासणीत शिधावाटप दुकान क्रमांक ४१-फ-२८७ (वाशी) या दुकानाचे मालक शाम बाजीराव जाधव, यांनी शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार जिन्नस दिलेले नाहीत. त्यामुळे या दुकानाचे प्राधिकारपत्र २ जुलैपासून रद्द केले आहे. दुकान क्रमांक ३६-फ-१८१ (ठाणे) या दुकानाचे मालक चेतन कल्याणजी सावला, हे निश्चित वेळेत दुकान उघडे ठेवत नसल्यामुळे व मोफत तांदळाचा साठा उपलब्ध नाही, अशी चुकीची माहिती देऊन शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे. ३६-फ-२१२या दुकानाचे मालक डायबेन अंबाजी पटेल, यांनी शिधापत्रिकाधारकांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात जिन्नस वितरीत केले नसल्याचे आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले.लॉकडाऊनमध्ये कठोर कारवाई : २४ मार्चपासून आजपर्यंत तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले. १३ दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित तर ७ दुकानांचे रद्द करण्यात आलेले आहेत.१० जुलैपर्यंत मोफत तांदूळसध्या जुलै महिन्याचे अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. जूनमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांना १० जुलैपर्यंत मोफत तांदूळ घेता येईल. आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत ५२ हजार ७४० व्यक्तींना आतापर्यंत चार हजार ९९९ क्विंटल मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनादेखील मे व जूनच्या अन्नधान्याचा लाभ १० जुलैपर्यंत घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही. तरीदेखील कोणत्याही अडचणी असल्यास ०२२-२५३३२६५७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :foodअन्नthaneठाणे