शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मेट्रो सर्व्हेसाठी महामेट्रोची नेमणूक, साडेतीन कोटीचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:53 IST

ठाणे : भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो अंतर्गत वाहतूकही करणार असून, त्यासाठी ठाणे पालिका प्रयत्न करते आहे.

ठाणे : भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो अंतर्गत वाहतूकही करणार असून, त्यासाठी ठाणे पालिका प्रयत्न करते आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत अंतर्गत मेट्रो सेवा विकसित करण्यासाठी आणि या सेवेचा तांत्रिक सुसाध्यता अहवाल व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महामेट्रोची नेमणूक करण्यात आली आहे.तिच्या अहवालावर तीन कोटी ५४ लाखांचा खर्च होणार असून, ही रक्कम पालिका पादचारी पूल-सबवे यातून या कामासाठी वर्ग करणार आहे. हा प्रकल्प लाइट रेल ट्रान्झिट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार असून, त्याचा फायदा वागळे, लोकमान्यनगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांसाठी होणार आहे.ठाण्यात कासारवडवलीपर्यंत मेट्रो धावणार आहे. यात मॉडेला चेकनाका ते कासारवडवली हे १०.६० किमीचे अंतर आहे. कापुरबावडी - ठाणे - भिवंडी -कल्याण असा अन्य मार्गसुद्धा प्रस्तावित आहे. त्यातील दोन स्थानके कापुरबावडी व बाळकुम येथे प्रस्तावित आहेत. दोन्ही मेट्रो रेल या कापुरबावडीत एकत्र येतील.ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट)चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंग रूट पद्धतीने या मार्गावरून प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रुटसाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनिवर अतिक्र मण आहे.काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे; परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेचीदेखील मंजुरी घेण्यात आली असून, येत्या काही दिवसांत महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरू होणार आहे.अंतर्गत प्रवासासाठी मेट्रो चालविण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, खर्च, कालावधी, त्यामुळे किती वेगाने किती प्रवाशांची वाहतूक शक्य होईल, याचा अहवाल सादर केला जाणार आहे. शहरातील एचसीएमटीआरच्या मार्गावरून नक्की कोणत्या वाहनातून प्रवास करायचा याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळेच आरक्षण असलेल्या या जागेवर कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही. अशावेळी महामेट्रो कंपनीच्या वतीने महापालिकेला किफायतशीर असा सर्व्हे मिळाल्यास भविष्यात ठाणेकरांना मेट्रोचा किफायतशीर प्रवासाची हमी मिळण्याची शक्यता आहे.>शहरातील या भागांना होणार फायदाअंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणे शक्य असल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका