शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती; मेहता गटाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:42 IST

BJP Ravi Vyas : नगरसेवक रवी व्यास यांची भाजपाच्या मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवार २१ जून रोजीच्या पत्रान्वये नियुक्ती केली आहे.

मीरा रोड - मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आघाडी उभारण्यात व्यास यांचा पुढाकार मोठा असून जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती मेहता गटाला धक्का मानला जात आहे. नगरसेवक रवी व्यास यांची भाजपाच्या मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवार २१ जून रोजीच्या पत्रान्वये नियुक्ती केली आहे. व्यास यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे . शिवाय महापालिका व पक्ष संघटनेत त्यांना कामाचा अनुभव आहे. 

मावळते जिल्हाध्यक्ष हेमंत मात्रे हे प्रकृतीच्या कारणाने हल्ली सक्रिय नव्हते. तर दुसरीकडे माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे समर्थक म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानत नव्हते.  विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे झाला. शिवाय त्यांची व्हायरल झालेली अश्लील व्हिडीओ क्लिप, बलात्काराचा गुन्हा तसेच अन्य अनेक गुन्हे, अनेक तक्रारींमुळे मेहता सतत वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यातूनच भाजपच्या व शहराच्या हितासाठी मेहता यांचा महापालिका आणि पक्षातील हस्तक्षेप थांबवण्यासाठी रवी व्याससह काही भाजपा नगरसेवकांनी आघाडी उघडलेली आहे. 

मेहता यांच्या विरोधात नगरसेवकांचा एक गट आक्रमक असून त्यात रवी व्यास आघाडीवर आहेत. व्यास यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी मेहता गटाचे चाललेले प्रयत्न फोल ठरल्याचे मानले जाते. मेहता व समर्थकांना मिळालेला हा धक्का मानला जात आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूका होणार असून व्यास यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्याने भाजपाची विस्कळीत झालेली संघटना पुन्हा बांधण्या सह पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान व्यास यांच्यासमोर आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा