शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर डिंपल ह्यांची एमएमआरडीच्या बैठकांच्या निमंत्रितपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 19:28 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची एमएमआरडीच्या बैठकांसाठी निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे. चक्रानुक्रमानुसार मेहता यांची निवड झाली झाली असून, निमंत्रित म्हणून त्या शहराच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची एमएमआरडीच्या बैठकांसाठी निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे. चक्रानुक्रमानुसार मेहता यांची निवड झाली झाली असून, निमंत्रित म्हणून त्या शहराच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत विविध महापालिका व नगरपरिषद, ग्रामपंचायती येतात.एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्राचा आवाका मोठा असल्याने प्राधिकरणाच्या हद्दीतील लोकप्रतिनिधींना एमएमआरडीएवर प्रतिनिधित्व देता यावे म्हणून महापालिकांचे चक्रानुक्रम पद्धतीने प्रत्येकी २ वर्षांकरिता तीन महापौर तर त्याच प्रमाणे प्रत्येकी २ वर्षांकरिता तीन नगरपरिषदांचे नगराध्यक्ष यांची निमंत्रित नियुक्ती केली जाते.या महापौर व नगराध्यक्षांना एमएमआरडीएच्या बैठकांना पदाधिष्ठीत निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाते. यंदाच्या निमंत्रितांमध्ये मीरा-भार्इंदर महापालिकेचा क्रमांक लागल्याने महापौर डिंपल मेहता यांची निमंत्रित म्हणून नियुक्ती दोन वर्षांसाठी केलेली आहे. त्यामुळे येत्या २ वर्षांतील एमएमआरडीएच्या बैठकांमध्ये महापौर मेहता सहभागी होऊ शकणार असल्याचे प्राधिकरणाच्या आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे त्यांना कळवले आहे. महापौरांच्या नियुक्तीमुळे शहरातील प्रकल्प मार्गी लागण्यास तसेच नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यासाठी त्या आग्रही भूमिका बजावतील, अशी आशा आहे.