शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

कोणत्याही हिंसेचे उत्तर हे अहिंसाच असते, मेधा पाटकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 01:44 IST

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे मत : डोंबिवलीत रंगला हेल्पिंग हॅण्ड्स वेल्फेअर सोसायटीचा नवरत्न सन्मान सोहळा

डोंबिवली : धर्माच्या नावाने झालेली हिंसा असो किंवा स्त्रीवर होणारे अत्याचार असू द्या, तसेच दलितांबाबत होणारी हिंसा असू द्या. हिंसा कोणतीही असू द्या, ती नाकारली पाहिजे. फाशीची शिक्षा १४६ देशांनी पाशवीवृत्ती म्हणून नाकारली आहे, तर त्यात भारत मागे का? याचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा दिली आहे, पण तरीही हिंसा थांबली नाही. याउलट, हिंसा वाढतच आहे. हिंसेला हिंसा हे उत्तर होऊ शकत नाही. हिंसेचे उत्तर अहिंसाच असते, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

‘हेल्पिंग हॅण्ड्स वेल्फेअर सोसायटी’तर्फे नवरत्न सन्मान सोहळा आदित्य मंगल कार्यालयात रविवारी पार पडला. यावेळी पाटकर बोलत होत्या. ‘लकीर के इस तरफ ही नर्मदा बचाव’ ही फिल्म दाखविण्यात आली. ‘हेल्पिंग हॅण्ड’ संस्थेचा लोगो आता टपाल तिकिटावर वापरला जाणार आहे. तसेच संस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. त्या प्रमाणपत्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, अभिनेत्री प्रियंका मुणगेकर, वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर, संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.हैदराबाद येथील घटनेविषयी पाटकर म्हणाल्या, ‘न्यायाच्या संकल्पनेच्या बाहेरची ही हत्या आहे. मनुष्यवध हा अपराध आहे. माझ्यासारख्या अनेक जणांना आणि १४६ देशांना आता हे पटले आहे. कोणताही मोठा गुन्हा व्यक्तीकडून घडला, तरी त्याची हत्या करू नये. कोणत्याही नशेत झालेली हिंसा ही आखणीपूर्वक केलेल्या हिंसेने कधी थांबू शकत नाही. अशा प्रकारचे एन्काउंटर होऊ शकत नाही. चार मुलांनी एवढ्या पोलिसांच्या गराड्यात बंदूक घेणे ही गोष्ट मला पटत नाही. कोर्टालाही यात काहीतरी काळे दिसत आहे. त्यात काय निघते, ते पाहू.’

श्रीगौरी म्हणाल्या, ‘मातृत्व यावर केवळ स्त्रीचा अधिकार नाही. त्यामुळे स्त्रीत्व आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी एकत्र करू नका. कोणतीही स्त्री आई होऊ शकते. त्यासाठी कोणावर तरी नि:स्वार्थी प्रेम करता आले पाहिजे. गायत्री माझ्या आयुष्यात वादळासारखी आली, त्यासाठी मी कधीही चिंच किंवा आवळे कधी खाल्ले नाही. आता मीही एक आई आहे. छोट्या मुली कचराकुंडीत टाकल्या जातात. मुलींवर अत्याचार होतात, तेव्हा माझे रक्त आई म्हणून खवळून निघते. मला त्यांना कोणालाही माफ करावेसे वाटत नाही. अत्याचार कोणत्याही पद्धतीचा नसावा. त्यावेळी मला सरस्वती दिसत नाही. ‘आजीच्या घरातील मुली’ पुन्हा सेक्स वर्करमध्ये जाणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मुलांमुळे आज मी आजीही झाली आहे. आयुष्याचा हा टप्पाही मी आनंदाने जगत आहे. ’खानविलकर म्हणाल्या, ‘वृत्तनिवेदक ज्या भूमिका मांडत असतो, त्या त्याच्या नसून संस्थेच्या असतात. त्यांचे विचार त्या भूमिकेपेक्षा वेगळे असू शकतात. गेल्या चार वर्षांपासून मी या संस्थेत येत आहे. ही संस्था चांगल्या पद्धतीने वाढत आहे. ही मुले भाषण देताना खूप आत्मविश्वासाने देत आहेत, हे पाहून आनंद वाटला.’मुधोळकर म्हणाल्या, ‘नोकरी, अभिनय अशा क्षेत्रात मुशाफिरी सुरू आहे. नोकरीच्या ठिकाणी मला अ‍ॅडजस्ट करतात. मी शाळेची कामेही कधी अर्धवट सोडत नाही. सचिन पिळगावकरांच्या चित्रपटातील माझी भूमिका सर्वात जास्त गाजली. प्रेक्षक आपल्यापेक्षा त्या कॅरेकटरवर प्रेम करतात.’सेन्सॉर बोर्डाचे काम योग्य नाहीबलात्कार हा एका व्यक्तीवर होत नाही. तो संपूर्ण कुटुंबाचा होतो. छोट्या गोष्टी विचार करण्याची प्रथा बदलू शकतात. चुकीच्या गोष्टी दाखविल्या तर त्या मुलांवर वाईट परिणाम करू शकतात. वेबसिरीज आल्या आहेत. मुलांच्या हातात मोबाइल असेल तेव्हा मला भीती वाटते. चित्रपटातून काय दाखवावे हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे, पण ते करीत नाहीत, असे श्रीगौरी सावंत म्हणाल्या.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली