शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनच्या मच्छीमारांनी आणखी एका व्हेल माशाला दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 19:50 IST

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात जाळ्यात अडकलेल्या आणखी एका व्हेल माशाला जीवदान दिले .  बोटीला व्हेलचा फटका लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . परंतु जीवाची पर्वा न करता ह्या मच्छीमारांनी व्हेलची जाळे कापून सुटका केली .  

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात जाळ्यात अडकलेल्या आणखी एका व्हेल माशाला जीवदान दिले .  बोटीला व्हेलचा फटका लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . परंतु जीवाची पर्वा न करता ह्या मच्छीमारांनी व्हेलची जाळे कापून सुटका केली.

उत्तनच्या नवीखाडी येथील नाखवा  कॅसलिन लंगडीमरी यांची विसावा नावाची मासेमारी बोट आहे . तांडेल  डॉल्टन  डुंगा व १८ मच्छीमार हे बोटीत भागीदार आहेत.  शनिवारी समुद्र किनाऱ्या पासून सुमारे ४२ किलोमीटर इतक्या लांब समुद्रात असताना मासेमारी साठी १३ जाळी टाकली होती . त्यातील एका जाळ्यात भलामोठा व्हेल मासा अडकला . 

सुमारे २० फूट लांब आणि अंदाजे २ हजार किलो वजनाचा हा भलामोठा व्हेल जाळ्यात अडकल्याने त्याला सोडण्यासाठी मच्छीमारांची एकच धावपळ झाली . त्यातच व्हेलचा बोटीला फटका बसला असता तर बोटीचे मोठे नुकसान होण्यासह बोट बुडण्याची भीती सुद्धा होती . मध्येच व्हेल खवळला कि भीती वाटायची असले मच्छीमारांनी सांगितले . अथक प्रयत्ना नंतर जाळी कापून व्हेलची सुटका करण्यात मच्छीमाराना यश आले . जाळीचे सुमारे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे . 

ह्या आधी बुधवार १२ मे रोजी उत्तनच्या भाटेबंदर येथील डेव्हिड गऱ्या यांच्या सहारा मच्छिमार बोटीच्या जाळ्यात  सुमारे २० फूट लांबीचा आणि अंदाजे १५०० किलो इतका वजनाचा व्हेल मासा सापडला होता . मच्छीमार व खलाशी यांनी जाळे कापून त्या व्हेल माशाची सुटका केली होती . 

 

  

 

टॅग्स :fishermanमच्छीमारMira Bhayanderमीरा-भाईंदर