शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट देण्याच्या नावाखाली ३२ लाखांची फसवणूकीतील आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:02 IST

अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील विनोद कोरगप्पा शेट्टी (३९) याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे खंडणी विरोधी पथकाची कारवाईआतापर्यंत दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील विनोद कोरगप्पा शेट्टी (३९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा तसेच त्याचा साथीदार विनोद याच्यासह पाच जणांनी दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून ३२ लाख रु पये घेतले. प्रत्यक्षात दुबे यांना अशा प्रकारचे कोणतेही कंत्राट त्यांनी मिळवून दिले नव्हते. त्यांच्या पैशांचा अपहार करु न त्यांची फसवणूक झाली होती. याच प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने आधी १२ डिसेंबर रोजी रोहित याल अटक केली. त्यापाठोपाठ आता १६ डिसेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बुरके, संदीप भांगरे आणि महेश साबळे आदींच्या पथकाने विनोदलाही लोकमान्यनगर भागातून अटक केली. त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील अन्यही आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक