शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वांगणी टर्मिनल म्हणून जाहीर करा; प्रवासी संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 00:26 IST

गेल्या काही वर्षांपासून वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वांगणी रेल्वेस्थानकावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत

अंबरनाथ : वांगणी हे टर्मिनल म्हणून जाहीर करावे तसेच वांगणी यार्डाचे विस्तारीकरण करून कर्जत दिशेला आवश्यक त्याठिकाणी क्रॉसओव्हरची व्यवस्था करून यार्डातील सर्व लोकल वांगणी- सीएसएमटी करण्यात याव्यात, अशी मागणी वांगणी प्रवासी संघटना व उपनगरीय प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वांगणी रेल्वेस्थानकावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे या भागात येत्या पाच वर्षांत १५ ते २० हजार सदनिका तयार होणार असल्याने प्रवासीसंख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यातच कर्जत, खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल अपुºया असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी नाइलाजास्तव यार्डातील लोकलने प्रवास करतात. त्यातून वांगणी व बदलापूरच्या प्रवाशांमध्ये संघर्ष होत आहे. हा संघर्ष परवडणारा नाही, याची जाणीव असल्यामुळे वांगणी प्रवासी संघटनेने सातत्याने यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

यार्डातील लोकल वांगणी-मुंबई करण्याची मागणी केली आहे. खासदार कपिल पाटील यांनीही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे वांगणी-मुंबई लोकल सुरू करण्याबाबत कळवले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य व वांगणी प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली. वांगणी टर्मिनल स्टेशन तत्काळ करावे, या मागणीसाठीची पत्रे शेलार तसेच प्रवासी महासंघाचे वरिष्ठ सल्लागार अ‍ॅड. दत्तात्रेय गोडबोले यांनी रेल्वे प्रशासनास सादर केली असून खासदार कपिल पाटील यांची लवकरच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काही वर्षांत बदलापूर-वांगणी महापालिका होऊ शकते. त्यामुळे वांगणी टर्मिनल हे बदलापूर व नव्याने होणाºया कासगाव या दोन्ही स्थानकांना फायद्याचे होणार आहे.

वांगणी स्थानकात सर्व सुविधावांगणी स्थानकात सायडिंग लाइन्स, मोटारमन रनिंग रूम उपलब्ध आहेत. त्यामुळे जादा मोटारमन, जादा लाइन्स व जादा लोकलपैकी कशाचाही भार न पडता वांगणी टर्मिनल अस्तित्वात येणार असल्याचा दावाही शेलार यांनी केला आहे. रेल्वेच्या मुंबई विभागाचे परिचालन प्रबंधक शिवाजी सुतार यांनीही प्रवासी संघटनेच्या चर्चेत वांगणी टर्मिनल करता येईल, असे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे