शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
2
कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार
3
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
4
PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'
5
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार 
6
"मला मूल नको होतं, पण...", प्रेग्नंन्सीनंतर अदिती सारंगधरला आलं होतं डिप्रेशन; म्हणाली- "नवऱ्याबरोबर भांडण व्हायचं..."
7
भारताच्या विजयाची शक्यता होती केवळ ८%; रोहितने खेळला 'डाव' अन् पाकिस्तानची 'दांडी गुल'
8
समोसा, पिझ्झा, बर्गर खाल्लं तरी वजन वाढणार नाही; फक्त करा 'हे' काम, रिसर्चमध्ये खुलासा
9
दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम
10
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
11
एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास
12
"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा
13
Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट
14
राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा
15
'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला 
16
सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
17
37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम
18
Chirag Paswan Net Worth: २ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे?
19
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
20
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!

खंडणी मागणाऱ्याचे नाव जाहीर करा;  काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:38 AM

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांना केले आवाहन

डोंबिवली : गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यांचे नाव त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे आणि प्रदेश सचिव जोजो थॉमस यांनी केली. हा खंडणीखोर कुणी राजकीय नेता आहे की माफिया ते उघड झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील गुडविन ज्वेलर्सच्या बंद दुकानासमोर गुरुवारी संध्याकाळी शेकडो ग्राहक जमले होते. त्या ग्राहकांची केणे आणि थॉमस यांनी भेट घेतली. तसेच काँग्रेस गुंतवणूकदारांसोबत असल्याचा विश्वास दिला. सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा परत मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गुडविन ज्वेलर्सचे संचालक व्हिडीओद्वारे आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप करतात. मात्र तरीही पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडू शकत नाहीत हे काय गौडबंगाल आहे, असे केणे म्हणाले. सत्ताधारी भाजप सत्ता स्थापन करण्यात मश्गुल असून सामान्य गुंतवणूकदार वाºयावर सोडला असल्याचे काही भान नाही, असे केणे म्हणाले. गुडविनचे गुंतवणूकदार तसेच नोकरीची शाश्वती नसलेले कर्मचारी यांच्याशी भाजप व शिवसेनेला काही देणे-घेणे नाही. गुडविनच्या मालकांना खंडणीसाठी धमकी देणारे राजकीय नेते किंवा माफिया कोण, हा प्रश्न धसास लागणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी त्याकरिता काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.आगामी काळात ठाणे, वाशी, चेंबूर या सर्व ठिकाणी असलेल्या गुडविनच्या ग्राहकांना एकत्र करुन लढा उभारण्यात येणार असल्याचे थॉमस यांनी सांगितले.