शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन् शिवसेना-भाजपाची एकमेकांच्या विरोधात तुंबळ घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:55 IST

जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले.

कल्याण - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील फ प्रभागात होत असलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी प्रभाग समितीच्या भाजप सभापती खुशबू चौधरी यांनी  प्रभाग अधिकारी अमित पंडीत व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात एक दिवसापूरती तरी निलंबनाची कारवाई अन्यथा महासभा तहकूब करा या मागणीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाद दिली नाही. त्याच्या विरोधात भाजप सदस्यांनी महासभेचे कामकाज रोखून धरण्यासाठी सभागृहात जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ माजला. या गोंधळात सभा पूर्ण दिवसाकरीता तहकूब करण्याची मागणी धुडकावून लावत सभा पटलावरील सर्व विषय मंजूर केले. याच मुद्यावर शिवसेना भाजप आमने सामने आले. सभेच्या पश्चातही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

सभागृहाच्या बाहेर पडून भाजप सदस्यांनी महापौर हाय हाय अशा जोरदार घोषणा दिल्या. त्याला शिवसेना महिला सदस्यांनी महापौर यांचा विजय असो असे प्रतिउत्तर दिले. भाजप सदस्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर जाऊनही घोषणाबाजी केली. तसेच तळ मजल्यावरही घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्याला शिवसेनेच्या महिलांनी तितक्याच जोरदारपणो प्रतिउत्तर देत महापौरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या प्रकारामुळे एकच गोंधळ माजला होता. फ प्रभाग समितीच्या सभापती खूशबू चौधरी यांनी प्रभाग समितीला कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना अर्थिक तरतूद नाही. समितीच्या सभेला अधिकारी गैरहजर राहतात. बेकायदा बांधकाम प्रकरणी कारवाई करीत नाहीत. प्रभाग अधिकारी अमित पंडीत व नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सभा तहकूबीची सूचना मांडली होती. त्यावर महापौर देवळेकर यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना निवेदन करण्यास सांगितले. 

अतिरिक्त आयुक्तांनी बेकायदा बांधकाम प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित अधिका:यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. त्यावर आयुक्तांनी निवेदन दिले आहे. त्यामुळे चौधरी यांनी सभातहकूबी मागे घ्यावी अशी विनंती केली. मात्र या विषयावर भाजप सदस्या प्रमिला चौधरी, राजन सामंत, गटनेते वरुण पाटील हे आग्रही होते. महिला सदस्यांचा महापौरांकडून अवमान केला जातो. तसेच अधिकारीही महिला सदस्यांना जुमानत नाही. महापालिकेच्या सर्व समित्यावर महिला सभापती केवळ नावाला आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे सभा तहकूबी करा असा आग्रह धरला. त्याला विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनीही दुजोरा दिला. मात्र महापौरांनी केवळ पाच मिनिटे सभा तहकूब केली. त्यानंतर सभेला महापौर समोरे गेले नाही. त्यांच्या जागी महापौर म्हणून सभागृह नेते राजेश मोरे यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा भाजप सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. पुन्हा मोरे यांनी दहा मिनीटे सभा तहकूबी केली. या गोंधळापश्चात पुन्हा महापौर सभागृहात आले. तेव्हा पुन्हा भाजप सदस्यांनी त्यांची मागणी लावून धरीत घोषणाबाजी केली. पाच व दहा मिनीटे दोन वेळा सभा तहकूब केली आहे. त्यामुळे सभा तहकूबी संपुष्टात आली आहे. मात्र भाजप सदस्य ठाम राहिले. त्यावर महापौरांनी सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय पुकारून सर्व विषयांना मंजूरी दिली. त्याला मंजूर मंजूर असा शिवसेनेच्या सदस्यांनी आवाज करुन सांगितले. लगेच राष्ट्रगीतीने सभा संपली. 

दरम्यान भाजप गटनेते पाटील व सदस्य राहूल दामले यांनी मंजूर केलेले विषय हे चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. महापौरांनी अधिका:यांना पाठिशी घातले आहे. आम्ही विषय मताला टाकण्याची मागणी केली होती. मात्र शिवसेनेची उपस्थिती कमी असल्याने त्यांनी त्यावर मतदान घेतले नाही. महापौरांच्या मनमानी विरोधात नगरविकास खात्याकडे व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका