शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:46 IST

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.

 कल्याण - कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा-या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड, प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.    सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कोलाज यांच्यातर्फे  कामगार दिनाच्या पूर्व संध्येला सार्वजनिक वाचलनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी गीतेश शिंदे, उमेश जाधव, आदित्य दवणो, वृषाली विनायक यांनी कविवर्य सुव्रे यांच्या कविता आणि कामगार चळवळीतील गीते सादर केली. त्याच बरोबर मार्क्‍सवादी विचारांची जोड असणा-या कविता ही सादर केल्या. रिवाईंड : प्रवास कवितेचा या कार्यक्रमातून एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येतो. यापूर्वी दिवंगत कवी निरंजन उजगरे यांनी अनुवादित केलेल्या कवितांवर प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यांच्या पुढील टप्प्यात काल सोमवारी कवि नारायण सुर्वे यांचा कवितेचा प्रवास सादर करण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, मिलींद कुलकर्णी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.         आदित्य दवणो यांनी ‘माङो विद्यापीठ’ही कविता सादर केली. ही कविता फार मोठी असल्याने त्यातील निवडक भाग सादर करण्यात आला. उमेश जाधव यांनी ‘तर समज’ ही कविता सादर केली. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गीतेष शिंदे यांनी ‘विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘सत्य’ या शीर्षकातील ‘तुङो गरम ओठ ओठावर टेकल्यास तेव्हा’ आणि व्हिजीट ही कविता सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा जन्मला आलेले गीत सादर करण्यात आले. हे गीत शाहीर अमरशेख यांचे असल्याचे गीतप्रेमींना वाटत होते. पण तसे नव्हते. या गीतांने सुव्रे प्रसिध्दीच्या झोतात आले. ‘डोंगरी शेत गं बाई मी बेनू किती’ हे गीत उमेश जाधव यांनी सादर करून प्रेक्षकांची टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद मिळविली. गीतेष आणि वृषाली यांनी ‘मार्क्‍स मला भेटला’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवाह ची दाद मिळविली. उमेश यांनी ‘काय ते पत्रत लिवा’, प्रौढ स्त्रीचे दुख मांडणारी ‘तिने खरकटी काढली’आणि गिरणीची लावणी ही चळवळतील गीतं सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. वृषाली यांनी निवेदनांसोबतच मनीऑर्डर मधील व्यक्तीचित्रण आणि मर्ढेकरांशी बातचीत या कविता सादर केल्या. गीतेशने लाईनमनच्या आयुष्यावरील कबुत:या , विश्वास ठेव या कविता सादर केल्या.  कार्यक्रमांचे प्रास्तविक राजीव जोशी यांनी केले. भिकू बारस्कर यांनी वाचनलयाची भूमिका मांडत आभारप्रदर्शन केले. सर्व कलाकरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोलाजतर्फे लवकरच आणखी एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येणार आहे, अशी माहिती गीतेश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणMaharashtraमहाराष्ट्र