शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद विश्व गुरुकुल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयांनी दत्तक घेतले पुरग्रस्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:51 IST

कोल्हापूर येथील भेंडवडे गावात १५ आॅगस्ट रोजी एक अनोखा रक्षाबंधन साजरा होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर येथील भेंडवडे गावात १५ आॅगस्ट रोजी एक अनोखा रक्षाबंधन२० टनांचा माल घेऊन कोल्हापूरकडे रवाना जवळपास ६५० घरांना आजून मदत पोहचली नाही : प्रा. प्रदीप ढवळ

ठाणे : ठाणे शहरातून विविध संस्थांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत असतानाच ठाण्यातील आनंद विश्व गुरु कुल आणि सतिश प्रधान ज्ञानसाधना या दोन महाविद्यालयांनी मु.पो. भेंडवडे, ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर हे गाव दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पुवर्संध्येला या दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, सेल्फ डिफेन्सचे विद्यार्थी मदतीसाठी रवाना होत आहे. १५ आॅगस्ट रोजी या गावात मदत पोहोचवून एक अनोख्याप्रकारे रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू असा जवळपास २० टनांचा माल घेऊन ही मंडळी कोल्हापूरकडे रवाना होत आहेत.            शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित, आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत करण्याचे ठरवले आहे. या गावातील जवळपास ६५० घरांना आजून मदत पोहचली नाही. महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी यांनी सर्वांना अवाहन केले की, पूरग्रस्त माणसांना तांदूळ, साखर, मीठ, पीठ, बिस्कीट, रेडी टू कुक पदार्थ, चादरी, कपडे तसेच शैक्षणकि साहित्य अशा पद्धतीची मदत करवी. हे आवाहन स्वयंसेवकानी तर केलेच पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरु वात ही स्वत:पासून करावी हे राष्ट्रीय सेवा योजनेने शिकवले त्यामुळे स्वत: स्वयंसेवक, प्राध्यापक, कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास ६० जणांचा ताफा गुरूवार १५ आॅगस्ट रोजी भेंडवडे गावाला पोहोचत आहे असे प्रा. प्रदीप ढवळ यांनी लोकमतला सांगितले. ही मदत गावातील प्रत्येक घरांत पोहोचविली जाणार आहे. रक्षाबंधनासाठी आपले भाऊ बहीण तर जवळ आहेतच पण त्या पूरग्रस्त माणसांना ठाऊक सुद्धा नसेल कि या पुरात आपले भाऊ बहीण कुठे असतील आणि कोणत्या परिस्थितीमध्ये असतील. अशा या भावा- बहिणींसाठी स्वयंसेवक त्यांचे भाऊ बहीण बनून त्यांना साथ देणार आहेत. दोन्ही महाविद्यालयाचा परिवार सज्ज झाला आहे भेंडवडे गावाला आधार देण्यासाठी, त्यांचे घर पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी आणि मदतीचा हात व प्रेमाची साथ देण्यासाठी. या गावाला एका दिवसापुरती मदत न देता ज्या ज्या वेळी गरज लागेल त्या त्या वेळी ती पुरविली जाणार असल्याचे आश्वासन प्रा. ढवळ यांनी दिले. विद्यार्थ्यांबरोबर शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे, महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते, डॉ. सुयश प्रधान, सिद्धेश बागवे व इतर प्राध्यापक वर्ग रवाना होत आहे.

टॅग्स :thaneठाणेkolhapurकोल्हापूरfloodपूर