शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत प्रकल्पाबाबत विद्यमान खासदार कमी पडताहेत, आनंद परांजपेंची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 11:18 IST

माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ''आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर मतदारसंघामध्ये रेल्वे आणि रस्त्यांच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिलं होतं.

डोंबिवली - माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ''आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर मतदारसंघामध्ये रेल्वे आणि रस्त्यांच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिलं होतं. केवळ पाठपुरावा करून हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले असते. परंतू दुर्दैवाने विद्यमान खासदार हे प्रकल्प पूर्ण करण्यात कमी पडले आहेत'', अशी टीका कल्याण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली.  कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रखडलेले महत्त्वाचे विकासप्रकल्प, मतदारसंघाची सद्यस्थिती, रेल्वेचे प्रश्न, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गलिच्छ राजकारण आदी विषयांबाबत अत्यंत बोचऱ्या शब्दांत आपली मते व्यक्त केली. खासदार म्हणून काम करत असताना आपण गटार आणि मीटर या नगरसेवकांच्या कामापेक्षा खासदाराच्या पदाला शोभतील अशा विकासकामांवर जास्त भर दिला. देशातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी ठाणे जिल्ह्याची ओळख होती. 

तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील 80 टक्के मतदार हे रेल्वेने प्रवास करणारे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रासदायक ठरणाऱ्या रेल्वे प्रवासातून दिलासा देण्याच्या उद्दिष्टाने आवश्यक रेल्वे प्रकल्पाना आपण प्राधान्य दिले. मग त्यामध्ये कल्याण टर्मिनस, 5व्या-6व्या रेल्वेमार्गाचे काम, ठाकुर्ली पूल, एस्केलेटर्स आदीचा पाठपुरावा केला. त्याचजोडीला कल्याण डोंबिवलीतील वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणारे मोठा गाव ते माणकोली पूल, रिंगरूट, कल्याण-शिळ मार्गाचे रुंदीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी प्रयत्नशील होतो. जेणेकरून 2019 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण झाले तर केवळ आपल्या मतदारसंघातील लोकांनाच नव्हे तर कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असता असे परांजपे यांनी सांगितले. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे निवडून आल्यानंतर आपण त्यांना हे प्रकल्प पूर्ण करून घेण्याबाबत बोललो होतो. 2019 पर्यंत हे जुने प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र ते होताना दिसत नाहीये आणि नवीन प्रकल्प तर अद्याप दूरच असल्याचे सांगत विकास प्रकल्प करून घेण्यात सत्ताधारी खासदार कमी पडत आहेत. येत्या 10 वर्षांत मतदारसंघात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा खासदार म्हणून विचार करून आपण काम केले पाहीजे. परंतू शिवमंदिर महोत्सव सोडला तर डॉ.श्रीकांत शिंदे यांचे काम काय? असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सत्ताधारी लोकांकडे विकासाचा अजेंडा, दृष्टिकोनच नाहीये. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार केवळ एकमेकांशी स्पर्धा करण्यामध्ये मश्गुल आहेत. त्यांच्या या अशा बेजबाबदार वागण्याचे दुष्परिणाम दोन्ही मतदारसंघातील विकासकामांवर होणार आहेत.  तर आपण खासदार असताना प्रत्येक प्रकल्पासाठी एकटेच केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील संबंधितांची भेट घ्यायचो. एकदाही आपल्या पालकमंत्र्यांना घेऊन जाण्याची वेळ आपल्यावर आली नाही. परंतु विद्यमान खासदारांची प्रत्येक बैठक ही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्हे तर कुशीतच होत असते असा मिश्किल टोलाही आनंद परांजपे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना