शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आनंद आश्रमाचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा? ठाकरे समर्थक गाफील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:02 IST

शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे ठाण्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट  आम्ही शिवसेनेत असून शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. शिंदे समर्थकांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. 

ठाणे  : एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाण्यातील स्व. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा बुधवारी ताबा घेतल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखांचा ताबा घेण्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेनाएकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आनंद आश्रमाचा शिंदे यांनी ताबा मिळवला आहे. आता ठाकरे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे ठाण्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट  आम्ही शिवसेनेत असून शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. शिंदे समर्थकांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. 

शक्तिप्रदर्शनातून ताकद दाखवून दिली. आनंद आश्रमाजवळ सोमवारी शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमाजवळ शक्तिप्रदर्शन केले. शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमाचा ताबा घेण्यास सुरुवात केली. हा ताबा घेत असताना शिवसैनिकांनी अद्याप त्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध केलेला नाही.

 दरम्यान आनंद आश्रमाची पडझड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता तेथे जात असल्याचे शिंदे समर्थक सांगत आहेत.

आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतून कुठेही गेलेलो नाही. आनंद आश्रमाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते कसे सुरू आहे, याची केवळ पाहणी करण्यासाठी आम्ही आनंद आश्रमात जमा झालो होतो.- संजय मोरे, माजी महापौर, ठाणे 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना