शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

By नितीन पंडित | Updated: January 30, 2024 17:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे.

नितीन पंडित, भिवंडी: लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात सुमारे ९८ हजार नव्या मतदारांची भर पडली आहे.भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात भिवंडी पश्चिम (१३६) मध्ये व भिवंडी पूर्व (१३७) मध्ये तर ग्रामीण तालुक्यात भिवंडी ग्रामीण (१३४) मध्ये असे तीन विधानसभा मतदारसंघ असून या तिन्ही मतदारसंघात एकूण ९७ हजार ७४२ नव्या मतदारांची भर पडली आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात १६ हजार २६४ नव्या मतदारांची वाढ झाली आहे.ज्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष मतदारां पेक्षा अडीच पट अधिक आहे. २०१९ मध्ये २ लाख ७५ हजार ८४३ मतदार नोंद होते.तर २०२४ मध्ये ४८०७  पुरुष, ११४०५ स्त्रिया तर ५२ इतर  यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या २ लाख ९२ हजार १०७ वर पोहचली आहे.          भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात २० हजार ७०७ मतदारांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये २ लाख ९६ हजार ६३९ मतदार नोंद होते. तर २०२४ मध्ये ९५७२  पुरुष,११ हजार ७१ स्त्रिया तर ६४ इतर  यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या ३ लाख १७ हजार ३४६ वर पोहचली आहे.

भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदार संघात ६० हजार ७७१ मतदारांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये २ लाख ५४ हजार ३८४ मतदार नोंद होते.त्यामध्ये २०२४ मध्ये २८ हजार ८९८ पुरुष, ३१ हजार ८६३ स्त्रिया तर १० इतर यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या ३ लाख १५ हजार १५५ वर पोहचली आहे.एकूण तालुक्याचा विचार केल्यास या तिन्ही मतदार संघ मिळून ४३ हजार २७७ पुरुष व ५४ हजार ३३९ स्त्रिया व १२६ इतर मतदारांची वाढ झाली आहे .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक