शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

शालेय साहित्याची रक्कम खात्यांमध्ये, स्थायी समितीची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:50 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ही रक्कम चार कोटी ४१ लाख रूपये असून सभेच्या वेळेवरच्या विषयांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता.शालेय साहित्य खरेदीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते. त्यानुसार महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शालेय साहित्य खरेदीची रक्कम वर्ग केली जाणार आहे. एकूण चार कोटी ४१ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा प्रस्ताव आज मांडला गेला. त्याला स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी मंजुरी दिली. महापालिका हद्दीत मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तामीळ आदी माध्यमांच्या ७१ शाळा आहेत. त्यात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बालवाडी, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, रेनकोट, वह्या, कंपास, बूट, मोजे, पीटी ड्रेस, स्पोर्ट शू, वॉटर बॅग, टिफीन बॉक्स या साहित्य खरेदीसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले. वास्तविक, हा विषय शाळा सुरु होण्यापूर्वीच मंजूर होणे आवश्यक होते.२७ गावे महापालिकेत आहेत; मात्र या २७ गावांतील २८ जिल्हा परिषदेच्या शाळांचा कारभार महापालिकेकडे हस्तांतरीत झालेला नाही. ही गावे महापालिकेत असल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यानाही शालेय साहित्य दिले जाणे आवश्यक असल्याची मागणी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सभेत केली. त्यावर अधिकारी जे. जे. तडवी यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया राबवून शालेय साहित्य खरेदी केली जात होती. २७ गावांतील २८ शाळांना शालेय साहित्य पुरविले गेले. त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बँक खाती उघडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना हा लाभ देता येणार नाही. यावर तोडगा म्हणून २७ गावांतील विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करुन, ते विद्यार्थ्यांना द्या असे आदेश सभापती दामले यांनी दिले.महापालिकांच्या विविध शाळांमध्ये भंगार साहित्य पडून आहे. त्याविषयी काही कारवाई केली जात नाही. उंबर्डे येथील शाळेतील भंगार साहित्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठा विभागानेही याची दखल घ्यावी. पाण्याच्या टाक्याजवळही असेच भंगार साहित्य असते. त्याठिकाणी अडगळीची जागा होते. त्यात एक कुत्रे मरुन पडल्याची बाब शिवसेना सदस्य निलेश शिंदे यांनी उपस्थित केली. मागच्यावर्षी एका जलवाहिनीतून कुत्र्याचे पिल्लू आले होते. महापालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयातही भंगार साचले आहे. ते विक्रीस काढा असे यावेळी सूचित करण्यात आले.महापलिका शाळांमधील भंगार विक्रीस काढण्याकरीता त्याचे मुल्यांकन करण्यात आले. त्यासाठी चार वेळा निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुनर्मुल्यांकन करण्यास शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून अद्याप पुनर्मूल्यांकन आलेले नाही, अशी माहिती उपायुक्त सु. रा. पवार यांनी दिली. पुनर्मुल्यांकन प्राप्त होताच भंगार विक्रीस काढले जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा