शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:52 IST

राम मंदिरासाठी चंद्रपूर येथून पाठविले लाकूड

ठाणे : आता संपूर्ण देशात   सर्वत्र राममय वातावरण तयार झाले आहे. आज प्रत्येक घरात राम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यात केले. महाराष्ट्र आणि अयोध्येचे आत्मीयतेचे नाते आहे. राम मंदिराच्या उभारणीकरिता लागलेले लाकूड हे चंद्रपूर येथून पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठाण्यातील उपवन तलाव येथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन  केले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या महाआरतीकरिता जबलपूर येथून ११ ब्राह्मण  आले होते. आज राज्यात सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरू आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत  ऐतिहासिक राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अयोध्येत राममंदिर उभारले जाणार हे स्वप्नवत वाटत होते. पण  करोडो रामभक्तांचे स्वप्न सोमवारी साकार होत आहे. 

ठाणे-कारसेवकांचे जिव्हाळ्याचे नाते

ठाणे आणि कारसेवकांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी मंदिराच्या उभारणीकरिता चांदीची वीट पाठवली होती, अशी आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. महाराष्ट्र आणि अयोध्येत  आत्मीयतेचे, श्रद्धा आणि भक्तीचे नाते आहे. म्हणूनच  एकटा जाण्यापेक्षा मी सोमवारी मंत्रिमंडळातील सदस्य खासदार, आमदार आणि येथील नागरिकांना घेऊन अयोध्येला जाणार आहे. आज राज्यात सगळीकडे मंदिराच्या उभारणीनिमित्त महाआरती आणि शोभायात्रा निघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. काही व्यक्तींनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ते चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरthaneठाणे