शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘घाणेकर’च्या सिलिंगची विनानिविदा दुरुस्ती; युद्धपातळीवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:26 IST

भरत जाधव यांच्या व्हिडीओने अब्रू चव्हाट्यावर

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील वातानूकुलीत यंत्रणा बंद असल्याचा अभिनेता भरत जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचे धिंडवडे निघाले आहेत. वास्तविक, घाणेकर नाट्यगृहातील स्टेजवरील सिलिंगचा काही भाग जून महिन्यात पडला होता. एक महिन्यानंतर त्याची आता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, एक महिन्यानंतर काम करताना त्याची निविदा काढलेली नसून त्याची मंजुरी ५-२-२ खाली घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच ज्या वेळेस जाधव यांचा प्रयोग चालू होता, त्यावेळेस एसी सुरू होते. परंतु, सिलिंगच्या दुरुस्तीसाठी वरील भाग पूर्ण उघडल्याने त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेले एक ते दीड वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवलेल्या नाट्यगृहात मग कशाची दुरुस्ती केली असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

शनिवारी भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग घाणेकर नाट्यगृहात सुरू होता. परंतु, घामाच्या धारांनी हैराण झाल्याने त्यांनी सोशल मिडियावर याची व्यथा मांडल्याने ती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पालिकेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. त्यानंतर रविवारी सभागृह नेते नरेश म्हस्के आणि सोमवारी आमदार संजय केळकर यांनी या नाट्यगृहाची पाहणी करून दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना पालिकेच्या संबधींत विभागाला दिल्या.

असे असले तरी ज्या दिवशी जाधव यांचा प्रयोग चालू होता, त्यादिवशी एसी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. परंतु, स्टेजवरील सिलिंगचा काही भाग पडल्याने त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी अख्खे भगदाड पाडण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून एसी सुरू असतांनाही स्टेजवर किंवा आजूबाजूच्या भागात कुलिंग झालेच नसल्याची बाब समोर आली आहे. परंतु, ही बाब पालिकेचा सार्वजनिक विभाग मान्य करण्यास तयार नसून त्यांनी याचे खापर इलेक्ट्रिकल विभागावर फोडले आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या मुद्यावरून किंवा होणाºया टिकेपासून वाचण्यासाठी आता या दोन विभागांमध्येच चांगलीच जुंपली आहे. प्रत्यक्षात पाहणी केली असता स्टेजवरील सिलिंगला मोठे भगडाद पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मंगळवारपर्यंत होणार दुरूस्तीनाट्यगृहाची दुरुस्ती ही अत्यावश्यक बाब असल्याने घटना जून महिन्यात घडली असतांनाही या ठिकाणी विविध नाट्यप्रयोग आणि इतर कार्यक्रम सुरू असल्याने दुरुस्ती करता आली नव्हती.परंतु,या कालावधीत पालिकेच्या संबधींत विभागाकडून निविदा काढणे शक्य होते किंवा त्याची प्रक्रिया सुरू करणे शक्य होते. परंतु, आता जाधव यांच्या व्हिडीओने टीका झाल्यानंतर तातडीची बाब म्हणून संपूर्ण सिलिंगच्याच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून मंगळवारी ते पूर्ण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.या कामाचा खर्च ५ -२-२ खाली तातडीची बाब म्हणून नंतर मंजूर केला जाईल, असेही आता पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBharat Jadhavभरत जाधव