शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पश्चिमेस पोलिसांच्या नाका तपासणीत अडकल्या रुग्णवाहिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:51 IST

Bhayander News : पूर्व - पश्चिम जोडणारा हा उड्डाणपूल मुख्य मार्ग असल्याने तपासणी मुळे वाहनांची लांब रांग लागून वाहनकोंडी झाली.

मीरारोड - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी परवानगी असणाऱ्यां व्यतिरिक्त कोणी बाहेर फिरू नये असे सतत आवाहन करून देखील अनेक बेशिस्त व बेजबाबदार लोक सर्रास बाहेर फिरत आहेत. पोलिसांनी बेजबाबदारांना लगाम घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. परंतु भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाखाली लावलेल्या नाकाबंदी मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यात रुग्णवाहिका अडकून पडल्याचे प्रकार घडले. 

मीरा भाईंदर शहरात कोरोना संसर्ग आणखी पसरू नये म्हणून परवानगी नसलेल्या लोकांनी बाहेर पडू नका असे सातत्याने सांगून देखील बेजबाबदार लोक मात्र ऐकण्यास तयार नाहीत . जेणे करून कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे कारणा शिवाय बाहेर पडणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी रन तपासणी सुरू केली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. परंतु कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या मुजोरां मुळे वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा फटका रुग्णवाहिकांचा सुद्धा बसत आहे. भाईंदर पश्चिमेस उतरणाऱ्या उड्डाणपुला खाली पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी गुरुवारी काटेकोरपणे करायला सुरुवात केली. पूर्व - पश्चिम जोडणारा हा उड्डाणपूल मुख्य मार्ग असल्याने तपासणी मुळे वाहनांची लांब रांग लागून वाहनकोंडी झाली.

वाहन कोंडीत पश्चिमेला येणाऱ्या रुग्णवाहिका अडकून पडल्या. उड्डाणपुलावरील रस्त्याच्यामध्ये दुभाजक असल्याने तसेच हा एकेरी मार्ग असल्याने रुग्णवाहिकांना मार्ग काढणे अवघड झाले. जेणेकरून काही रुग्णवाहिकेत रुग्ण सुद्धा कोंडीत अडकून पडल्याने विलंब झाल्यास रुग्णाची प्रकृती बिघडण्याची भीती निर्माण झाली. जागरूक नागरिक व पोलिस अडकलेल्या रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत वाट मोकळी करून देत होते. परंतु वाहनकोंडीमुळे रुग्णवाहिकांना मार्ग काढणे अवघड झाले होते. अखेर पोलिसांनी काहीकाळ तपासणी थांबवत वाहनांची कोंडी दूर करत रुग्णवाहिका वाटेला लावल्या. यापुढे रुग्णवाहिकेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत नाकाबंदी व तपासणी केली जाणार आहे.

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर