शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

ऑक्सिजनची सुविधा असलेली हवी रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 01:01 IST

खासगी रुग्णवाहिकेचा दर पाच ते सहा हजार असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

बदलापूर : बदलापूर पालिका क्षेत्रात कोरोनाबाधिताची प्रकृती खालावल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी आॅक्सिजन यंत्रणा असलेली रुग्णवाहिका गरजेची आहे. मात्र बदलापूर पालिका कोरोनाशी लढत असताना अशा प्रकारची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. बदलापूर पालिकेने जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने सोनिवली येथे केअर सेंटर उभारले आहे. या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना हलवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवल्यास त्या रुग्णाला उल्हासनगर किंवा जिल्हा रुग्णालयात हलविण्याची वेळ येते. अशावेळी त्या रुग्णाला आॅक्सिजन असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र पालिकेच्या रुग्णवाहिकेत ही यंत्रणा नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागते. खासगी रुग्णवाहिकेचा दर पाच ते सहा हजार असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.>कोरोनामुळे दोघांचा मृत्यूकल्याण : कल्याण-डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोनामुळे शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला. परिणामी मृतांची एकूण संख्या ७१ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या दोन जणांपैकी एक जण कल्याण पश्चिमेतील तर दुसरा रुग्ण टिटवाळा परिसरातील आहे. आज नव्याने २४३ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ३२५७ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १८४८ इतकी आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्यांची एकूण संख्या १३३८ इतकी आहे.‘लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर गुन्हे नोंदवा’मीरा रोड : मीरा भार्इंदरमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºयाची लूट करणाºया रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु राज्य सरकारने सर्व महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांनी किती दर आकारावे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही रुग्णांना वाट्टेल तेवढ्या रकमेचे बिल दिले जात आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. अशा गैरफायदा घेणाºया रुग्णालयाविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.>जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅक्सिजन यंत्रणा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी केली आहे. दोन ते तीन दिवसांत रुग्णवाहिका उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.- दीपक पुजारी, मुख्याधिकारी, बदलापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस