शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील प्रेशिया कंपनीला भीषण आग; तीन कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 18:18 IST

अंबरनाथ मोरीवली गावातील औद्योगिक वसाहतीमधील प्रशिया केमिकल कंपनीला दुपारी 2 वाजता आग लागली.

अंबरनाथ : अंबरनाथ मोरीवली गावातील औद्योगिक वसाहतीमधील प्रशिया केमिकल कंपनीला दुपारी 2 वाजता आग लागली. या आगीमुळे कंपनीतील केमिकलच्या ट्रमचा मोठा स्फोट होऊन त्यात संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक झाली. या आगीत चार कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोरीवली एमआयडीसीमधील या प्रेशिया कंपनीत रसायणांवर प्रक्रिया केली जाते. या कंपनीतील घातक केमिकल हे सुरक्षित न ठेवल्याने त्या केमिकलने पेट घेतला. त्यामुळे या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. दुपारी 2 वाजता हा प्रकार घडल्यावर कंपनीत 13 कामगार काम करीत होते. मात्र कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व कामगारांनी पळ काढला. त्या दरम्यान कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वती प्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कंपनी ही रेल्वे रुळाला लागून असल्याने आगीच्या ज्वाळा या रेल्वे रुळापर्यंत येत असल्याने तब्बल अर्धा तास रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर संथ गतीने या मार्गावरून रेल्वे सेवा सुरू झाली. तर दुसरीकडे ही आग विझविण्यासाठी अंबरनाथ पालिका, बदलापूर पालिका, उल्हासनगर महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिकांसोबत अंबरनाथ एमआयडीसी कंपनीचे अग्निशमनच्या गाड्या आल्या होत्या. सुरुवातीला ही आग पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली.आजूबाजूच्या कंपनीला आग लागणार नाही, यासाठी पाणी मारण्यात येत होते. तसेच ही आग रेल्वे रूळाच्या बाजूलाही पसरणार नाही, याची दक्षता घेण्यात येत होती. ही आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतून मार्ग काढत अग्निशमन दलाला आगीच्या ठिकाणी पोहचावे लागले.  आग विझवली जात असताना कंपनीत ठेवलेले अनेक घातक रसायनांच्या ट्रमचे स्फोट मोठ मोठ्याने होत होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी अडचणी निर्माण होत होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.